15 ऑगस्टला पंतप्रधान आणि 26 जानेवारीला राष्ट्रपतीच का करतात ध्वजारोहण?

भारत देशात 76व्या स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणची तयारी जोरात सुरु झाली आहे.गव्हर्नर माउंटबॅटन यांनी जून 1974 साली भारत आणि पाकिस्तान फाळणी झाली.नंतर भारतीय स्वातंत्र्यच्या कायद्यानुसार ’15 ऑगस्ट 1947 ‘ ला भारताला स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व मिळाले. आता पुन्हा एकदा 15 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवणार आहेत.  देशामध्ये  स्वातंत्र्यचा सगळीकडे जल्लोष साजरा केला जाणार आहे.तसेच ज्यांनी देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आपले बलिदान दिले.त्यांचे स्मरण स्वातंत्र्याच्या गाण्यांमधून केले जाईल. देशामध्ये प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिन हे दोन राष्ट्रीय सण म्हणून साजरे केले जातात.

 

प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती ध्वजारोहण करतात आणि स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान ध्वजारोहण करतात.असे का होते याचा विचार कधी केला आहे का? असे करण्याचे कारण काय? दोन्ही राष्ट्रीय सणांना ध्वजारोहण करण्याचा नियम का वेगळा आहे, हे आपण समजून घेऊ.

 

स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण यामधील फरक 

15 ऑगस्ट हा गुलामगिरीच्या साखळीतून मुक्त झाल्याचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. आणि 26 जानेवारी रोजी  प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. कारण प्रजासत्ताक दिन हा 26 जानेवारी 1950 मध्ये भारतीय राज्यघटना लागू केल्याची आठवण म्हणून हा दिन साजरा केला जातो.15 ऑगस्टला विशेष म्हणजे ध्वजारोहणासाठी ध्वज खाली बांधला जातो आणि दोरीने वर घेतला जातो, त्यानंतर तो फडकवला जातो.हे भारताला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 रोजी मिळाले  म्हणून राष्ट्रीय सण साजरा केला जातो.आणि प्रजासत्ताक दिनी ध्वज वर बांधला जातो नंतर फडकवला जातो.

 

 ध्वजारोहण

स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानच का करतात ध्वजारोहण?

भारताला खरे तर स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट 1947 साली पासूनच सुरवात केली आहे.स्वातंत्र्यदिनी फक्त देशाचे पंतप्रधानच ध्वजारोहण करतात,कारण भारत जेव्हा स्वातंत्र्य झाला होता, त्यावेळी देशामध्ये संविधान लागू केले नव्हते.  संविधान लागू केले नाही,तोपर्यंत  राष्ट्रपतींनी पदभार स्वीकारला नव्हता. त्यामुळे प्रथमच देशामध्ये पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकवण्यात आला. तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली आहे.

भारतीय संविधान जानेवारी 1950 रोजी लागू करण्यात आल्यापासून राष्ट्रपती या दिवसाची जबाबदारी घेऊन ध्वजारोहण करतात, कारण ते देशाचे घटनात्मक प्रमुख आहेत.

 

वेगवेगळ्या असतात जागा

प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर कार्यक्रम आयोजित केला जातो. येथे भव्य परेड देखील होते.आणि स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवर ध्वजारोहण होते, येथून पंतप्रधान देशवासीयांना संबोधित करतात.

हेही वाचा 

‘जागतिक हत्ती दिन’ कोणत्या उद्देशाने साजरा करण्यात आला हा दिवस घ्या जाणून….

 

join Our–  WHATSAPP GROUP  ,INSTAGRAM , TWITTER   ,  FACEBOOK PAGE– for every update 

2 thoughts on “15 ऑगस्टला पंतप्रधान आणि 26 जानेवारीला राष्ट्रपतीच का करतात ध्वजारोहण?”

Leave a Comment