उद्धव ठाकरे गटाचे २ शिलेदार अडचणीत; आर्थिक गुन्हे शाखा चौकशीसाठी बोलावणार

Breaking : एकीकडे महाविकास आघाडीच्या प्रमुख पक्षांची आज बैठक होत असून दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचे 2 शिलेदार अडचणीत सापडले आहे.विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपताच आता  पुन्हा राजकीय हालचालींना वेग आला आहे.माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि  उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय आमदार रवींद्र वायकर यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी बोलावले  जाणार आहे.आग्रीपाडा पोलीस ठाण्यात कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी आजच किशोरी पेडणेकर यांच्या विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या यांनी केलेली तक्रारीवरून, जोगेश्वरी येथील उद्यानासाठी राखीव जागेत अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी रवींद्र वायकर यांना चौकशीसाठी बोलावले आहे.  तसेच मुंबई महापालिका अधिकाऱ्यांशी संगनमत करून राजकीय दबाव वापरून ही कामे करून घेतली जातात. असा आरोप सोमय्यांनी लावला आहे . त्यानुसार वायकरांची चौकशी होणार आहे.

 

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर कोविड सेंटरमध्ये बॉडीबॅग खरेदी घोटाळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बॉडीबॅग खरेदी करत असताना बाजारभावापेक्षा तिप्पट किंमत देऊन खरेदी करण्यात आल्या होत्या. याची प्राथमिक चौकशी केल्यानंतर पोलिसांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच बीएमसीच्या 2 अधिकाऱ्यांवरही पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. ज्या कंपनीकडून बॉडीबॅग खरेदी करण्यात आली त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही पोलीस चौकशीसाठी बोलावले जाणार आहे. 

 

सकाळी ११ वाजल्यापासून रवींद्र वायकर याना आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशी सुरू आहे. आता किशोरी पेडणेकर यांनाही लवकरच चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.तर पेडणेकर यांच्यावर कोविड काळातील खरेदी घोटाळ्यात गुन्हा दाखल केला आहे. तर वायकर यांच्यावर गार्डनच्या राखीव जागेवर पंचतारांकित हॉटेल बनवल्याचा आरोप आहे. शिवसेना फुटीनंतरही हे दोन्ही नेते उद्धव ठाकरेंसोबत कायम राहिले आहेत.त्यामुळेच आता ठाकरेंकडील 2 शिलेदार मोठ्या अडचणीत सापडल्याचे चित्र समोर आले आहे.

 

1 thought on “उद्धव ठाकरे गटाचे २ शिलेदार अडचणीत; आर्थिक गुन्हे शाखा चौकशीसाठी बोलावणार”

Leave a Comment