2000 Rupees Notes : 2000 रुपयांच्या नोटा लवकर ‘जमा’ करा नाही तर…आतापर्यंत किती नोटा झाल्या जमा

2000 Rupees Notes:  रिझर्व्ह बँकेने चलनातून 19 मे 2023 रोजी आरबीआयने दोन हजार रुपयांच्या नोटा(2000 Rupees Notes) चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती.त्यानंतर बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सप्टेंबर महिना अखेरपर्यंत मुदत असून आता अखेरचे 60 दिवस शिल्लक राहिले आहेत.31 जुलै पर्यंत दोन हजार रुपयांच्या चलनातील 88 टक्के नोटा बँकेकडे जमा झाल्याची माहिती आरबीआयने दिली आहे.

31 जुलै 2023 पर्यंत 3.14 लाख कोटी रुपये मूल्यांच्या 2000 रुपयांच्या नोटा बँकांमध्ये परत आल्या आहेत. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, 19 मे 2023 पर्यंत 3.56 लाख कोटी मूल्याच्या 2000 रुपयांच्या नोटा चलनात होत्या.आता 2000 हजार रुपयाच्या नोटा जमाकरण्यासाठी किंवा बदलण्यासाठी 30 सप्टेंबर 2023 हि शेवटची तारीख आहे. आता फक्त चलनात 42 ,000 कोटी रुपयांच्या नोटा चलनात उरल्या आहेत.

 

19 मे 2023 रोजी आरबीआयच्या 2,000 रुपयांच्या नोटा(2000 Rupees Notes) चलनातून बाद करण्याच्या घोषणेपासून आतापर्यंत 88 टक्के नोटा परत आल्या आहेत. RBI ने सांगितल्याप्रमाणे ,बँकाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार ,31 जुलै 2023 पर्यंत 3.14 कोटी रुपयांच्या नोटा चलनातून बँकिंग प्रणाली मध्ये जमा झाल्या आहेत. तर 13 टक्के 2000 रुपयांच्या नोटा या इतर नोटांसोबत बदलण्यात आल्या आहेत. शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळण्यासाठी, लोकांनी 30 सप्टेंबर 2023 पूर्वी नोटा जमा किंवा बदलण्या करण्याचे आवाहन आरबीआयने केले आहे. 

 

2000 हजारच्या नोटा बदलण्यासाठी मुदतवाढ मिळणार का ?

2000  हजार रुपयाची नोट(2000 Rupees Notes) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चलनातून मागे घेतल्यानंतर,बँकांमधून दोन हजारांची नोट बदल्याणास सुरवात झाली आहे . नोटा बदलण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे ,हि नोटा बदलण्यासाठी  मुदतवाढ मिळणार का? या चर्चा सुरु असताना केंद्र सरकारने यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. अर्थ मंत्रालयाने दोन हजार रुपयांची नोट बदली करून घेण्याच्या प्रकियेमधील कोणताही मुदतवाढ बद्दल प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे.

 

Join Whatsapp Group.

2 thoughts on “2000 Rupees Notes : 2000 रुपयांच्या नोटा लवकर ‘जमा’ करा नाही तर…आतापर्यंत किती नोटा झाल्या जमा”

Leave a Comment