Akshay Kumar Indian Citizenship: कॅनडा कुमार म्हणून हिणवणाऱ्यांची बोलती बंद! अक्षय कुमारने मिळवलं भारताचं नागरिकत्व

Akshay Kumar Indian Citizenship : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारला (Akshay Kumar) भारताचे नागरिकत्व मिळाले आहे. अक्षयकडे यापूर्वी कॅनडाचे नागरिकत्व होते, त्यामुळे त्याला अनेकदा नेटकऱ्यांनी ट्रोल केले होते. आता अक्षयला भारताचे नागरिकत्व मिळाले आहे.  नुकतीच सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करुन अक्षयनं याबाबत माहिती दिली आहे.

 

अक्षयनं शेअर केली पोस्ट

 

काही महिन्यांपूर्वी अक्षय कुमार कॅनडाच्या नागरिकत्वावरून होणाऱ्या टीकेवर प्रतिक्रिया दिली होती. अक्षय म्हणाला होता, ९० च्या दशकात त्याचे चित्रपट चालत नव्हते म्हणून त्याने कॅनेडिय नागरिकत्वासाठी अर्ज केला होता. मी कामासाठी कॅनडामध्ये गेलो. मात्र, माझे दोन चित्रपट प्रदर्शित झाले आणि नशिबाने ते सुपरहिट ठरले. त्यानंतर, अक्षय कुमार भारतातील बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणून देशभर सुपरहीटही झाला. “भारत माझ्यासाठी सर्वस्व आहे.(Akshay Kumar Indian Citizenship) मी जे काही कमावलंय, जे काही मिळवलंय ते इथूनच मिळालंय. मला त्याची परतफेड करण्याची संधी मिळतेय हे मी माझं भाग्य मानतो. जेव्हा काहीही माहित नसताना लोक बोलतात तेव्हा वाईट वाटतं,” असं अक्षय कुमारने म्हटलं होतं.

आता, अक्षय कुमारने भारतीय नागरिकत्त्वाचं प्रमाणपत्र शेअर करत सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दिल और सिटीझनशीप दोनोही हिंदुस्तानी… जय हिंद.. असे अक्षय कुमारने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यासोबतच, भारतीय नागरिकत्त्वाचं प्रमाणपत्राचा फोटोही त्याने शेअर केला आहे

 

अक्षयचा आगामी चित्रपट

OMG 2 चित्रपटानंतर अक्षय ‘सोरारई पोटरू’या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 1 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षयसोबत राधिका मदन आणि परेश रावल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अक्षयच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

2 thoughts on “Akshay Kumar Indian Citizenship: कॅनडा कुमार म्हणून हिणवणाऱ्यांची बोलती बंद! अक्षय कुमारने मिळवलं भारताचं नागरिकत्व”

Leave a Comment