Amruta Subhash: ‘त्यानं मला विचारलं, तुझ्या मासिक पाळीची तारीख…’ ; अमृतानं सांगितला सेक्रेड गेम्स-2 मधील इंटिमेट सीन शूट करण्यापूर्वीचा अनुभव

एका मुलाखतीमध्ये अमृतानं सेक्रेड गेम्स-2 या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक अनुभव सांगितला.

Amruta Subhash:  मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देखील आपल्या अभिनयानं विशेष ओळख निर्माण करणारी अभिनेत्री अमृता सुभाषनं (Amruta Subhash) ही सध्या तिच्या लस्ट स्टोरीज-2 (Lust Stories 2) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अमृताचे लस्ट स्टोरीज-2 या चित्रपटात काही इंटिमेट सीन्स आहेत. अमृता ही सध्या लस्ट स्टोरीज-2 या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. या चित्रपटाचं प्रमोशन करताना एका मुलाखतीमध्ये अमृतानं सेक्रेड गेम्स-2 या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक अनुभव सांगितला.

सेक्रेड गेम्स-2 या अनुराग कश्यपनं दिग्दर्शित केलेल्या वेब सीरिजमध्ये अमृतानं महत्वाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटामधील इंटिमेट सीनच्या शूटिंगचा अनुभव अमृतानं मुलाखतीमध्ये सांगितला. ती म्हणाली,  ‘माझा पहिला सेक्स सीन मी अनुराग कश्यपच्या सेक्रेड गेम्स-2 या चित्रपटामध्ये केला. अनुराग कश्यप हा शूटिंग करताना खूप संवेदनशीलपणे विचार करत होता. त्यानं मला त्यावेळी प्रश्न विचारला की,  तुझ्या मासिक पाळीची तारीख काय आहे? कारण त्यादरम्यान त्या सीनचे शूटिंग नको करु.

अमृतानं वळू, श्वास, विही हापूस,किल्ला या मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच गल्ली बॉय या हिंदी चित्रपटामुळे अमृताला विशेष लोकप्रियता मिळाली.  सेक्रेड गेम्स-2, बॉम्बे बेगम्स आणि सास बहू आचार प्रा. ली या वेब सीरिजमधील अमृताच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.  आता अमृता ही नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील लस्ट स्टोरीज-2 या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अमृताच्या आगामी प्रोजेक्ट्सची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Subhash (@amrutasubhash)

लस्ट स्टोरीज-2 ची स्टार कास्ट

अमृतासोबतच काजोल, तिलोतमा शोम, अमृता शुभाश, अंगद बेदी, कुमुद मिश्रा, मृणाल ठाकूर आणि नीना गुप्ता, तमन्ना भाटिया, विजय वर्मा या कलाकारांनी देखील लस्ट स्टोरीज-2 मध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे.आर बाल्की, सुजॉय घोष, अमित रविंदरनाथ शर्मा आणि कोंकणा सेन शर्मा या चार दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या कथा लस्ट स्टोरीज-2 या चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत. हा चित्रपट प्रेक्षक नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकणार आहेत.

Leave a Comment