Anil kapoor with Kangana Ranaut साठी पत्नीला सोडयला तयार झाले होते अनिल कपूर; काय आहे पूर्ण प्रकरण

Anil kapoor would leave wife sunita kapoor for bollywood actress kangana ranaut

Actors Anil Kapoor :  खटाटोप करत अभिनेत्याने ‘प्रेम विवाह’ तर केला, पण एक काळ असा होता जेव्हा कंगना रनौत हिच्यासाठी पत्नीलाही सोडायला तयार झाले होतं अनिल कपूर…!

आज त्यांच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहेत, पण एका वेळी अशी होती, जेव्हा अनिल कपूर यांनी अभिनेत्री कंगना रनौत हिच्याबद्दल मनात असलेल्या भावना व्यक्त केल्या होत्या. फक्त कंगना हिच्याबद्दलच नाही तर, अनेक मुद्द्यांवर अनिल कपूर वक्तव्य करत वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. ज्यामुळे त्यांना टीकेचा देखील सामना करावा लागला. दरम्यान दिग्दर्शक करण जोहर याने ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये अनिल कपूर यांना असा प्रश्न विचारला ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती. आज त्या घटनेची चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेली असते. आता देखील कंगना आणि अनिल कपूर यांच्यामधील खास गोष्टीची चर्चा रंगत आहे.

 

कंगना रनौत अभिनेते अनिल कपूर आणि संजय दत्त यांच्यासोबत करणच्या शोमध्ये पोहोचली होती. तेव्हा करणने कंगला स्वतःवर काही काम करतेस का? असा प्रश्न विचारला. करणच्या प्रश्नाला कंगनाने होकार दिला. तर पुढे करणने, ‘दुसऱ्या पद्धतीने स्वतःवर काम करते का?’ असा प्रश्न विचारताच कंगना म्हणाली, ‘करण तुला नक्की विचारायचं तरी काय आहे?”

करणने प्लास्टिक सर्जरीचा उल्लेख करताच अभिनेत्री म्हणाली, ‘मी काहीही केलेलं नाही… कारण मी उत्तरेकडील आहे आणि तेथील मुलींकडे जन्मतः सौंदर्य असतं.’ कंगना हिला प्रश्न विचारल्यानंतर करणने अनिल कपूर यांच्याकडे आपल्या प्रश्नांचा मोर्चा वळवळा..

करण याने अनिल कपूर यांना विनोदी अंदाजात विचारलं, ‘कोणत्या अभिनेत्रीसाठी पत्नीला सुनीता कपूर यांना सोडाल?’ यावर अधिक विचार न करता अनिल कपूर यांनी कंगना रनौत हिचं नाव घेतलं. ज्यामुळे तुफान चर्चा रंगल्या होत्या. एवढंच नाही तर, कंगना देखील अनिल कपूर यांचं उत्तर ऐकून हैराण झाली होती. अभिनेत्री कंगना रनौत कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

कंगना रनौत हिने अनेक अभिनेत्यांसोबत महत्त्वाची भूमिका साकारत बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केले आहे. शिवाय अभिनेत्री कायम वादग्रस्त वक्तव्य करत चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असते. कायम वादाचा मुकूट डोक्यावर घेवून मिरवणारी कंगना सोशल मीडियावर सक्रिय असते.

कंगना आता लवकरच ‘एमरजेन्सी’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात अभिनेत्री माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्रीने सिनेमाचा टीझर प्रदर्शित केला आहे. सिनेमाच्या टीझरला प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला. आता चाहते ट्रेलर आणि सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

Leave a Comment