Artificial Intelligence: ‘एआय’चा वापर करुन, पैसे कसे कमावले जाऊ शकतात

Artificial Intelligence: सध्याच्या जगामध्ये दिवसेंदिवस आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) चे प्रमाण वाढत जात आहे. मानवी जीवनातील प्रत्येक क्षेत्राला एआयने व्यापून टाकले आहे.प्रत्येक क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण संशोधान करण्यासाठी एआय टूल्स चा वापर लक्षणीय आहे .गेल्या काही दिवसांपासून ओपन एआयने आणलेल्या चॅट जीपीटीची मोठी चर्चा सुरु आहे.

 

एआय मध्ये दिवसेंदिवस एआय चे नवीन चे नवीन टूल्स येत आहेत,आता काही तज्ञांच्या मते ज्यांना नोकरीची गरज आहे किंवा ज्यांना पैसे कमवायचे आहेत त्यांच्यासाठी चॅटजीपीटीद्वारे एआय सुवर्णसंधी निर्माण करत आहे. हे पैसे दोन प्रकारे कमावले जाऊ शकतात. सर्वात महत्वाचे म्हणजे, यासाठी कोणत्याही अटी तुमच्यावर घातल्या जात नाहीत. तुमचे शिक्षण किंवा तुमची मालमत्ता याचा कोणताही संबंध येत नाही. त्यामुळे पैसे कमावण्याचा सोपा मार्ग मानला जात आहे.

 

 

एआय टूलद्वारे लिखाण

तुम्हाला लेखन, ग्राफिक डिझाईन किंवा फोटो आणि व्हिडिओ एडिट करता येत असतील तर तुम्ही या कौशल्याचा वापर करुन पैसे कमाऊ शकता. एआय टूल्स तुम्हाला लिहिण्यात किंवा डिजिटल आर्टवर्क तयार करण्यास मदत करू शकतात. मात्र एआय टूलद्वारे केलेले लिखाण तुम्ही तपासून घेतले पाहिजे.

 

छोटा व्यवसायधारकांसाठी

इंटरनेट ऍक्सेस असलेले छोटे व्यवसाय मालक AI (Artificial Intelligence) चा अभ्यास करू शकतात आणि त्यांच्या कंपनीचा महसूल कसा वाढवायचा हे समजू शकतात. बुटीक सल्लागार कंपनी ओम्नी बिझनेस इंटेलिजेंस सोल्युशन्सच्या सीईओ जॅकलिन डीस्टेफानो-टांगोरा म्हणाल्या, ‘एआय तुम्हाला प्रत्येक छोट्या गोष्टीत मदत करू शकते. विशेषत: ज्यांचा छोटा व्यवसाय आहे, त्यांच्यासाठी ही मदत प्रभावी ठरू शकते.

याशिवाय, एआयद्वारे पैसे कमावण्याचा तिसरा मार्गदेखील आहे तो म्हणजे एआय ट्यूशन हा आहे. मात्र सध्या यासाठी लागणारे तंत्रज्ञान उपलब्ध नसल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, चॅटजीपीटीसारखे अधिक विकसित असलेला चॅटबॉट माणसांच्या नोकऱ्या घालवणार अशी शंका निर्माण होताना दिसत आहे.

आता चॅटबॉट आणि एआय कोणकोणत्या क्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. याबरोबरच, माणसाच्या नोकरीवर गदा आणणार की आणखी रोजगार निर्माण करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

✅कृपया हि माहिती सर्वाना पाठवावी ,जेणे करून प्रत्येकजणाला या एआय(Artificial Intelligence) टूल्सचा वापर वापर करता येईल .अशाच प्रकारे योजना ,बिसनेस , मनोरंजन , लाइफस्टाइल आणि ताज्या बातम्या सर्व माहिती वेळेवर मिळवण्यासाठी   व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हावे.