काय सांगता? बचत खात्यावर दुप्पट व्याज! भल्या भल्यांना माहिती नाहीय बँकेतील ही ऑटो स्विप सुविधा

जर तुम्हाला तुमच्या बचत खात्यातील रकमेवर अधिक व्याज मिळत नसेलतर, तर तुम्ही अशा वेळेस ऑटो स्विप सुविधाचा(auto sweep facility)फायदा होऊ शकतो.ऑटो स्विप सुविधा म्हणजे काय? ते आपण जाणून घेऊ…

 

ऑटो स्विप सुविधा(auto sweep facility) म्हणजे काय ?

प्रत्येक बँकेत ही सुविधा उपलब्ध असते. समाजा,बचत खातेधारकाने त्याच्या बचत खात्यात ऑटो स्विप सुविधा सुरु केल्यास,त्याला एफडीची सुविधा म्हणजेच मुदत ठेव देखील त्याच्या खात्यातून आपोआप सुरू होते.जेव्हा खातेदारांच्या खात्यामध्ये जास्त पैसे असताता.त्यानंतर ते पैसे ग्राहकाच्या नावाने एफडीमध्ये जमा होतात.यामध्ये जास्त व्याज मिळते.यामध्ये ग्राहक बचत करण्याची मर्यादा ठरवू शकतात. यामध्ये बचत खात्यामधील सर्व हालचालीबद्दल ग्राहकाच्या मोबाईलवर संदेश येतात.तसेच बचत खात्यामध्ये पैसे ठरवलेल्या मर्यादेपेक्षा पैसे कमी असतील तर,एफडीच्या खात्यातून पैसे आपोआप बचत खात्यामध्ये  जमा होतात.या सुविधा मध्ये दोन्हीचा लाभ मिळतो.

ऑटो स्विपचे(auto sweep facility) फायदे:

ऑटो स्विप सुविधा चा फायदा घेतल्यास तुम्हाला बचतीच्या पैशांमधून, तुम्हाला एफडीचा चांगला परतावा मिळू शकतो. सर्वसाधारण पणे बचत खात्यामध्ये 34 टक्के वार्षिक व्याज मिळू शकते.तर एफडीमध्ये 6.८ टक्के व्याज मिळते.जर तुम्ही ठराविक काळासाठी एफडी चालू केली असेल, तर त्याचा कालावधी पूर्ण होणे,पर्यंत तुम्हाला व्याज जमा करावे लागतात.जर तुम्ही एफडी मध्ये कालावधी पूर्ण होण्याआधी बंद केली तर नुकसान होते. जर तुम्ही या ऑटो स्विप सुविधांचा वापर केल्यास तुम्हाला या अडचणींचा सामना करण्याची गरज लागणार नाही.यामध्ये तुम्ही तुमचे पैसे सहजपणे,कधीही कोणत्याही प्रकियाशिवाय काढू शकतात..

 

ही सुविधा कशी कराल सुरू?

ही सुविधा सुरु करण्यासाठी आपल्याला एफडी खात्याला बचत खात्याशी लिंक करावे लागते.यामध्ये तुम्हाला खात्यामधील पैसेची मर्यादा निश्चित करावी लागते.नंतर तुम्हला खात्या मध्ये किती पैसे ठेवायचे आणि उरलेले पैसे एफडी मध्ये हस्तांतरित करायचे.हे तुम्हाला बँकेत सांगावे लागेल.या सुविधांचा लाभ तुम्ही ऑनलाईन किंवा बँकेला (ऑफलाईन) भेटून घेऊ शकतात.

 

 

JOIN WHATSAPP GROUP  , FOLLOW INSTAGRAM ,FOLLOW TWITTER   ,FOLLOW FACEBOOK

 

2 thoughts on “काय सांगता? बचत खात्यावर दुप्पट व्याज! भल्या भल्यांना माहिती नाहीय बँकेतील ही ऑटो स्विप सुविधा”

Leave a Comment