Azamgarh Student Death : आझमगढ मुख्याध्यापक आणि शिक्षक अटक प्रकरण, 8 ऑगस्टला शाळा बंद ठेवण्याचे आवाहन

Azamgarh Student Death: विद्यार्थिनी मृत्यू प्रकरण आता हे चांगलेच तापले आहे. यानंतर उत्तर प्रदेशात एकच हल्लकल्लोळ माजली आहे.आझमगढ मध्ये विद्यार्थिनी चा संशयास्पद मृत्यू झाल्या प्रकरणी शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्या निषेधार्थ  8 ऑगस्ट रोजी खाजगी शाळा बंदची हाक देण्यात आली आहे. विद्यार्थिनीच्या कन्या महाविद्यालयातील संशयास्पद मृत्यूप्रकरणी शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्याविरोधात अनाएडेड प्रायव्हेट स्कूल असोसिएशनने बंदची हाक दिली आहे.

 

8 ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यातील खासगी शाळा बंद ठेवण्याचे आवाहन असोसिएशनने केले आहे. विद्यार्थिनीचा 31 जुलै रोजी अकरावीच्या विद्यार्थिनीने  इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला होता याप्रकरणी मुख्याध्यापक आणि शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.उद्या खाजगी शाळा बंदला किती प्रतिसाध देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी

हि अशी मृत्यूची दुःखद घटना घडायला नको होती,पण मुख्याध्यापक आणि शिक्षकाची अटक चुकीची असल्याचे म्हणत चौकशीची मागणी केली आहे. या चोकशी मध्ये जर कोणी दोषी आढळले,तर त्याला जरूर शिक्षा द्यावी.असे संघटनेचे म्हणणे आहे. याच्या निषेधार्थ सर्व खाजगी शाळा बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पालकाने आपल्या मुलांना शाळेमध्ये 9 ऑगस्ट रोजी पाठवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून मुलीने टोकाचे पाऊल उचले हे आरोप नातेवाईकांनी केले आहेत. आझमगढमधील महिला महाविद्यालयात अकरावीच्या विद्यार्थिनीने इमारतीवरुन उडी मारून जीवन संपवले आहे. याप्रकरणी शिक्षक आणि मुख्याध्यापकांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून  त्यांना अटक करण्यात आली. मात्र याप्रकरण विषयी आधी चौकशी व्हावी. मग दोषींवर कारवाई व्हावी, असे संघटनेचे म्हणणे आहे. तर 9 ऑगस्ट रोजी सर्व खाजगी शाळांचे शिक्षक आणि इतर कर्मचारी काळ्या फिती बांधून निदर्शन करणार असतील.

 

join Our–  WHATSAPP GROUP  ,INSTAGRAM , TWITTER   ,  FACEBOOK PAGE– for every update 

 

Leave a Comment