Beed News: बीडमध्ये मुलानेच केला डॉक्टर बापाचा खून, अपयश आल्यानंतर नैराश्यातून खून केल्याच उघड

Beed News: पोटच्या मुलानेच नैराश्यातून जन्मदात्या डॉक्टर बापाचा डोक्यात लोखंडी वस्तूचा वार करून खून केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये (Beed News) घडली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ  उडाली आहे.  याप्रकरणी आरोपी मुलाच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

बीड शहरातल्या अंकुश नगर भागामध्ये मृत डॉक्टर सुरेश काशीनाथ कुलकर्णी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. त्यांचा मुलगा सुधीर कुलकर्णी हा 2010 मध्ये बीएएमएसमध्ये पास झाला होता.  त्यानंतर तो तीन वर्षापासून एमडीचे शिक्षण घेत असताना त्याला अनेक वेळा अपयश आल्याने नैराश्यातून त्याने डॉक्टर असलेले आपले वडील काशिनाथ कुलकर्णी यांच्या डोक्यात लोखंडी वस्तूने जबर वार करून त्यांची हत्या केली.

या घटनेनंतर शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळावर दाखल झाले होते. त्यांनी या घटनेचा पंचनामा केला असून मयत काशिनाथ कुलकर्णी यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. तर याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अधिक तपास करत आहेत.

Leave a Comment