नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट; पत्नीच्या तक्रारीवरून फायनान्स कंपनी विरोधात गुन्हा!

Breaking : नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्या बद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. नितीन देसाई यांनी आपल्याच एन.टी .फिल्म स्टुडिओ मध्ये 2 ऑगस्टला आत्महत्या केली होती. ते आपल्या डोक्यावर कर्जाचा बोजा असल्यामुळे त्रस्त होते. यावर त्यांची पत्नी नेहा देसाई यांनी एका फायनान्स कंपनी विरोधात खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

कोट्यवधीचे कर्ज नितीन देसाई वर होते. या कर्जाच्या वसुलीसाठी एडल वाईज  ग्रुपचे अधिकारी आणि ई सी एल (ECL)फायनान्स कंपनी यांनी सारखा कर्ज वसुलीचा तगदा लावला होता. तसेच त्यांनी मानसिक त्रास दिला होता. त्यानंतर मानसिक त्रासाला कंटाळून नितीन देसाई यांनी आत्महत्या केली. अशी तक्रार नेहा देसाई यांनी केली होती.

हि तक्रार मिळाल्या नुसार खालापूर पोलीस ठाण्यात भादवि  306, ३४ अन्वये ECL फायनान्स कंपनी / एडलवाईज ग्रुपचे पदाधिकारी व इतर असे एकुण पाच जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या सदर गुन्हयाचा तपास विक्रम कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी, खालापुर विभाग हे करीत आहेत.

 

Leave a Comment