बलाढ्य रशियाच्या ‘Luna 25’ चंद्र मोहिमेला सर्वात मोठा धक्का! आता सर्वात “आधी” जाणार चंद्रयान-3

Luna 25 : बलाढ्य रशियाच्या मिशन मूनला सर्वात मोठा धक्का बसला आहे. रशियाचं लूना-25(Luna 25) हे यान लँडिंग होण्याच्या आधीच क्रॅश झालं आहे. त्यामुळे हे यान संपर्काबाहेर गेल्याने रशियाचं मिशन मून(MISSON MOON) अपयशी ठरलं आहे. भारताच्याही आधी चंद्रावर पाऊल ठेवण्याचं रशियाचं स्वप्न होतं. भारताच्या चांद्रयान-3 च्या दोन दिवस आधीच म्हणजे उद्याच 21 ऑगस्ट रोजी हे यान चंद्रावर पाऊल ठेवणार होतं. पण त्याआधीच रशियाच्या मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. रशियाच्या स्पेस स्टेशननेही लून -25चा संपर्क होत नसल्याचं स्पष्ट म्हटलं आहे. चंद्राच्या पृष्ठभागाला धडक दिल्यानंतर लूना-25(Lunna 25) यान भरकटलं असून या यानाचा संपर्क तुटला असल्याचं सांगितलं जात आहे.

मीडिया रिपोर्टनुसार आधी आपल्या निर्धारीत मार्गावरून हे यान भरकटलं आणि चंद्राच्या पृष्ठभागाला धडकल्याचं सांगितलं जात आहे. लँडिंग पूर्वीच हे यान क्रॅश झाल्याने त्याचा संपर्क झाला नाही. विशेष म्हणजे हे यान उद्याच 21 ऑगस्ट रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिग होणार होतं.

काल मध्यरात्रीच या यानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर संशोधकांनी या यानातील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आलं नाही. यान हे आधीच भरकटलं आणि चंद्राच्या पृष्ठभागाला जाऊन धडकलं. त्यामुळे Luna 25 हे यान क्रॅश झालं. त्यामुळे रशियाचं चंद्रावर पाऊल ठेवण्याचं स्वप्न भंग झालं आहे.

या यानाला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरायचं होतं. मात्र, चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यापूर्वीच यान क्रॅश झालं. चंद्राच्या एका भागाची माहिती घेण्यासाठी हे यान उद्या सोमवारी 21 ऑगस्टला चंद्रावर उतरणार होतं. आणि या याद्वारे चंद्रावरील गोठलेलं पाणी आणि चंद्रावरील किंमती तत्त्वांचा शोध घेतला जाणार असल्याचं अशी माहिती संशोधकांनी सांगितली.

राष्ट्रपती पुतीन यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प(Luna 25)

चंद्राच्या कक्षेत यांनाला एका आपत्कालीन स्थितीचा सामना करावा लागला. त्याचं विश्लेषण करण्यात येत आहे, अशी माहिती रशियाची अंतराळ संस्था रॉसकॉसमॉसने स्पष्ट केलं आहे. Luna 25 हे यान 11 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दिशेने झेपावलं होतं. चांद्र मोहीम ही रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांची एक महत्त्वकांक्षी योजना आहे. रशियाला अंतराळातील महाशक्ती बनविण्याचा त्यामागचा प्रयत्न होता.

आता चांद्रयान-3 ची मोहीम यशस्वी ठरल्यास चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरवणारा भारत पहिला देश ठरेल.सर्व देशाच्या तुलनेत मोहीम यशस्वी झाल्यास अमेरिका, सोव्हिएत युनियन आणि चीननंतर चंद्रावर यान उतरवणारा भारत हा चौथा देश ठरेल.

 

हे सुद्धा वाचा 

Chandrayaan 3 Launch Today | Chandrayaan 3 चे उद्दिष्ट्य;Chandrayaan 2 मध्ये चंद्रापासून 2.1 किमी उंचीवर जे घडले ते पुन्हा घडू शकते का?वाचा सविस्तर

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आहे तरी काय? चांद्रयान-3 आणि लुना-25 गाठणार ‘दक्षिण ध्रुव

 

join Our–  WHATSAPP GROUP  ,INSTAGRAM , TWITTER   ,  FACEBOOK PAGE– for every update

Leave a Comment