Rahul Gandhi Flying Kiss : राहुल गांधी यांनी फ्लाईंग किस दिला; स्मृती ईराणी यांचा गंभीर आरोप

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपूरच्या हिंसेवरून केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्ला केला आहे . राहुल गांधी यांनी आज  प्रचंड आक्रमक झाले होते. केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी आज राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधी यांनी  फ्लाईंग किस दिला,असून त्यांनी महिलांचा अपमान केला आहे.यामुळे महिला खासदारांचा अपमान केला आहे.यामुळे राहुल गांधी वर कारवाई झाली पाहिजे.असे स्मृती ईराणीने मागणी केली आहे.त्यांच्या सोबत 22 महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे यांच्याकडे तक्रार केली आहे.

 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत भाग घेतला. यावेळी राहुल गांधी यांनी  भाजपवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्यानंतर स्मृती ईराणी या भाषणाला उभ्या राहिल्या.त्यांनी राहुल गांधी वर जोरदार पलटवार केला. स्मृती ईराणी आरोप करत असताना राहुल गांधी सभागृहाबाहेर पडले. राजस्थानला जाण्यासाठी ते सभागृहाबाहेर पडले होते.

 

खासदार हसले म्हणून…

स्मृती ईराणी यांनी राहुल गांधी यांनी फ्लाईंग किस दिल्याचा आरोप केला.राहुल गांधी(Rahul Gandhi ) हे सभागृहातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे.राहुल गांधी हे लोकसभा परिसरातून बाहेर पडत असताना त्यांच्या काही फायली खाली पडल्या. त्या खाली पडलेल्या फाईली उचलण्यासाठी राहुल गांधी वाकले असताना ते पाहून भाजपचे खासदार हसायला लागले.त्यावर राहुल गांधी यांनी हसणाऱ्या खासदारांना फ्लाईंग किस दिला आणि ते तिथून हसत निघून गेले, असं काही लोकांचं म्हणणं आहे.

22 महिला खासदारांचं पत्र

राहुल गांधी यांनी फ्लाईंग किस चा आरोप केल्यानंतर,पण हा क्षण कॅमेऱ्यात कैद झालेला नसल्याचं सांगितलं जात आहे. तर राहुल गांधी यांचा फ्लाईंग किस सीसीटीव्हीत कैद झाला असावा,त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरा चेक करण्यात यावी, हि अशी मागणी करण्यात आली आहे.

 

हि कृती करणे चुकीचं असल्याचं सांगत भाजपच्या 22 महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे धाव घेऊन याबाबतची तक्रार केली आहे. राहुल गांधी(Rahul Gandhi ) यांनी महिलांचा अपमान केला आहे.यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी करण्यात आली.यामध्ये फक्त एक महिलाच विरोधी व्यक्तीच महिला खासदारांना फ्लाईंग किस देऊ शकतो.असा प्रकार यापूर्वी कधी पाहिला नाही,ते महिलांबाबत काय विचार करतात, अशी टीका स्मृती ईराणी यांनी केली आहे

 

 

 

join Our–  WHATSAPP GROUP  ,INSTAGRAM , TWITTER   ,  FACEBOOK PAGE– for every update

1 thought on “Rahul Gandhi Flying Kiss : राहुल गांधी यांनी फ्लाईंग किस दिला; स्मृती ईराणी यांचा गंभीर आरोप”

Leave a Comment