भारताचा तिरंगा झळकला पण, पाकिस्तानचा नाही; त्याच चौकात बुर्ज खलिफावर दिसली कोणाची ‘औकात’

भारत पाकिस्तान वैर हे आताचे नाही तर गेल्या सात-आठ दशकांपासूनचे आहे. पाकिस्तान भारताच्या वाटेत काटे रचण्याचे काम करतो. गेल्या वर्षी दुबईची जगातील सर्वात मोठी इमारत बुर्ज खलिफावर भारताचा तिरंगा झळकला होता. यामुळे पाकिस्तानींना यंदा त्यांचा झेंडा इमारतीवर झळकायला हवा होता. परंतू, बुर्ज खलिफाच्या प्रशासनाने नकार दिला. १४ ऑगस्टच्या मध्यरात्री जमलेल्या पाकिस्तानींचा मोठा हिरमोड झाला. यामुळे 15 ऑगस्टच्या मध्यरात्री भारताचा तिरंगा झळकणार की नाही याची उत्सुकता भारतीयांनाच नाही तर पाकिस्तानींना देखील होती.

 

भारताचा स्वातंत्र्यदिवस सुरु होताच गगनचुंबी बुर्ज खलिफा तिरंगी रंगात न्हाऊन निघाला आणि पाकिस्तानींना मिरच्या झोंबू लागल्या. 14 ऑगस्टच्या पूर्वसंध्येपासून पाकिस्तानी लोक बुर्ज खलिफाच्या परिसरात जमू लागले होते. पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देत होते. मध्यरात्री 12 वाजता गर्दी वाढली होती. पाकिस्तानींनी काऊंटडाऊन सुरु केले, पण रात्री 12 वाजता बुर्ज खलिफावरील लाईट लागल्याच नाहीत. पाकिस्तानचा हिरवा झेंडा झळकलाच नाही… या बेईज्जतीच्या घटनेचा व्हिडीओ खुद्द पाकिस्तानी शेअर केला आहे. बुर्ज खलिफावर पाकिस्तानी झेंडा न झळकल्याने पाकिस्तानी नागरिक प्रचंड संतापले होते. देशाच्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्यासाठी हे सर्व लोक शेकडोंच्या संख्येने मध्यरात्रीच बुर्ज खलिफा येथे पोहोचले होते. ही वास्तू आपल्या राष्ट्रध्वजाच्या रंगांनी उजळून निघेल या आशेने ते पाहत होते. “12.01 मिनिटे झाली तरी पाकिस्तानी झेंडा झळकला नाहीय, हीच का आपली औकात”, असा शब्दांत तरुणी नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.

bruj khalifa

अमेरिकेतही भारतीय स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.येथे भारतीय न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअर येथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र आले होते. यावेळी संपूर्ण परिसरदेशभक्तीपर गीतांनी दुमदुमून गेला. यावेळी तेथे तिरंगाही फडकवण्यात आला.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, त्यांचे फ्रेंच समकक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानी आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी भारताला ७७ व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, जगभरातील भारतीयांनी स्वातंत्र्यदिनी उत्साहात साजरा केला.

भारताबरोबर त्यांची ‘विशेष’, ‘विशेषाधिकारप्राप्त’ आणि ‘धोरणात्मक’ भागीदारी महत्त्वाची आहे, असे या नेत्यांनी यावेळी अधोरेखित केले. मंगळवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा संदेशात राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले की, दोन्ही राष्ट्रे एकत्रित प्रयत्नांद्वारे तसेच रचनात्मक भागीदारीद्वारे सर्व क्षेत्रांमध्ये फलदायी द्विपक्षीय सहकार्याला चालना देत राहतील असा विश्वास आहे.

 

हेही वाचा

Parsis New Year 2023: आज आहे पारशी नववर्ष; जाणून घ्या पतेती आणि नवरोझमधील फरक?

 

join Our–  WHATSAPP GROUP  ,INSTAGRAM , TWITTER   ,  FACEBOOK PAGE– for every update

Leave a Comment