Chandrayaan 3 Landing : चंद्रयान 3 च्या लँडिंगवेळी काही गडबड झाली तर इस्रो काय करणार? पहा इथे प्रत्येक क्षणाचे मिळेल लाइव्ह अपडेट

Chandrayaan 3 Landing : भारतीय अंतराळ संस्था असलेल्या इस्रोच्या चंद्रयान 3 मोहिमेकडे साऱ्या जगाचं लक्ष लागून लागलेले आहे. आता अवघ्या जगाच्या नजरा भारताच्या चंद्र मोहिमेकडे आहेत.चांद्रयान-3 (Chandrayaan-3) चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज झालं आहे. चांद्रयान-3 बुधवारी 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजून 04 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर (Chandrayaan-3 Landing) उतरणार आहे. चंद्रयान-2 मोहिमेवेळी याच वेळेला नेमकी गडबड झाली होती आणि मोहीम अपयशी ठरली होती.

चंद्रयान-3 यशस्वीरित्या चंद्रावर उतरल्यानंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरणारा भारत हा पहिला देश असणार आहे.आणि सर्व देशाच्या तुलनेत अमेरिका, रशिया आणि चीननंतर अशी कामगिरी करणारा भारत हा चौथा देश असणार आहे. मात्र या मोहिमेत काही गडबड झाल्याचं कळालं की ही मोहीम 27 ऑगस्ट पर्यंत टाळली जाणार आहे. लॅडर मॉड्युल चंद्रावर उतरण्याच्या दोनतास आधी याबाबत निर्णय घेतला जाईल.

निलेश एम. देसाई (संचालक, इस्रोच्या स्पेस अँप्लीकेशन सेंटर) यांनी सांगितले की ” लँडिंग संबंधित निर्णय हा लँडर मॉड्यूलची स्थिती आणि चंद्राच्या त्या वेळेच्या स्थितीवर अवलंबून आहे. चंद्रयान-3 हे 23 ऑगस्टला चंद्रावर उतरण्याच्या दोन तासांआधी हा निर्णय घेतला जाईल.जर परिस्थिती अनुकूल नसेल तर चंद्रयानचं लँडिंग 27 ऑगस्टपर्यंत टाळली जाईल. पण अशी काही स्थिती कदाचित निर्माण होईल असं वाटत नाही.त्यामुळे चंद्रयान चंद्रावर(Chandrayaan 3 Landing) यशस्वीरित्या उतरेल.”

चंद्राच्या पृष्ठभागावर (ISRO Lunar Mission) उतरण्याआधी चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरने चंद्राचे फोटो आणि व्हिडीओ काढले आहेत. इस्रोने हे फोटो आणि व्हिडीओच्या ट्विटरच्या माध्यमातून शेअर केले आहेत.

“सर्वकाही फेल झालं तरी ‘चंद्रयान 3’ चं विक्रम लँडर होणार यशस्वी”(Chandrayaan 3 Landing)

“विक्रम लँडर 23 ऑगस्टला चंद्रावर उतरेल यात काही शंका नाही. यात सर्व सेंसर आणि दोन इंजिन काम करत नसेल तरी लँडिंग निश्चित आहे. कारण तशाच पद्धतीने डिझाईन करण्यात आलं आहे.”, असा इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी विश्वास व्यक्त केला आहे.

 

इथे पाहू शकता प्रत्येक क्षणाचे लाईव्ह अपडेट(Chandrayaan 3 Landing)
  • भारताचा हा ऐतिहासिक विजय थेट पहायचा असेल, तर तुम्ही OTT प्लॅटफॉर्म Hotstar वर थेट पाहू शकता. येथे तुम्हाला चांद्रयान 3 चा इतिहास आणि लाइव्ह अपडेट्स बघायला मिळतील.
  • चांद्रयान-3 #countdowntohistory चे थेट प्रक्षेपण 23 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता नॅशनल जिओग्राफिक चॅनल आणि Disney+Hotstar वर सुरू होईल, म्हणजेच (Chandrayaan 3 Landing) चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम उतरण्याच्या काही तास आधी, तुम्ही त्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकाल.
  • गौरव कपूर आणि आघाडीचे अंतराळ तज्ज्ञ या शोचे सूत्रसंचालन करणार आहेत. हा शो दर्शकांना वेळ आणि जागेच्या प्रवासात घेऊन जाईल, शेवटच्या वेळेपर्यंत काउंटडाउन कॅप्चर करेल.
  • नॅशनल जिओग्राफिकच्या मते, फ्यूचरिस्टिक एआर व्हीआर ग्राफिक्स आणि रंजक तथ्यांसह, शो या मिशनमागील रॉकेट विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मूलभूत गोष्टी स्पष्ट करेल.
  • जर तुम्हाला चांद्रयान 3 चे लँडिंग लाईव्ह बघायचे असेल आणि एकही क्षण चुकवायचा नसेल तर तुम्ही ते इस्रोच्या अधिकृत YouTube चॅनेलवर पाहू शकता.
  • यासाठी तुम्हाला Chandrayaan-3 LIVE Telecast वर निर्दिष्ट वेळेनुसार क्लिक करावे लागेल आणि तुम्हाला चांद्रयान 3 सहज पाहता येईल.
  • यासाठी, तुम्ही आधीच या चॅनेलची सदस्यता घेऊ शकता आणि त्याची अधिसूचना चालू करू शकता, जेणेकरून जेव्हा चांद्रयान 3 चे थेट प्रक्षेपण होईल तेव्हा तुम्हाला सूचना मिळेल. असे केल्याने तुम्ही हे ऐतिहासिक क्षण तुमच्या डोळ्यांनी टिपू शकाल.

 

हेही वाचा 

ISRO ही एक कंपनी म्हणून जाणून घ्या, ती कुठून कमावते, गोदरेजपासून या कंपन्या भागीदार का आहेत?

 

join Our–  WHATSAPP GROUP  ,INSTAGRAM , TWITTER   ,  FACEBOOK PAGE– for every update

2 thoughts on “Chandrayaan 3 Landing : चंद्रयान 3 च्या लँडिंगवेळी काही गडबड झाली तर इस्रो काय करणार? पहा इथे प्रत्येक क्षणाचे मिळेल लाइव्ह अपडेट”

Leave a Comment