Chandrayaan-3 update | ISRO च्या चंद्रमोहिमेचा आणखी एक यशस्वी टप्पा! यानाची दोन भागात विभागणी, तर पुढे काय होणार?

Chandrayaan-3 update | भारताच्या चंद्रयान 3 मिशन मधील आज महत्त्वाचा टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे. म्हणजेच आतापर्यंत चंद्रयान 3 चा प्रवास नियोजित वेळेप्रमाणे पूर्ण होत आहे. इस्रोच्या चंद्रयान 3 (Chandrayaan-3) मध्ये आज (17 ऑगस्ट) गुरुवारी दुपारी 1.8 वाजता विक्रम लँडर (Vikram Lander) प्रोप्युलुशन मॉडेलपासून वेगळं केला आहे. प्रॉपल्शन मॉड्युल आणि लँडिंग मॉड्युलचा आता प्रवास स्वतंत्र सुरु झाला आहे.

चांद्रयान-3 चा एक यशस्वी टप्पा :आता ISRO ट्विट करत चंद्रयान 3 बद्दल(Chandrayaan-3 update) मोठी अपडेट दिली आहे.”लँडर मॉड्यूल (एलएम) म्हणाले की, ‘प्रवासासाठी धन्यवाद, मित्रा!’ लँडर मॉड्यूल (LM) प्रोपल्शन मॉड्यूल (PM) पासून यशस्वीरित्या वेगळं करण्यात आलं आहे. उद्या दुपारी 4 वाजता नियोजित डीबूस्टिंग होईल, त्यानंतर लँडर मॉड्यूल (LM) चंद्रापासून जवळच्या कक्षेत लँडिंगसाठी सेट करण्यात येईल.

 

 

’23 ऑगस्ट’ ला चांद्रयान-3 चंद्रावर उतरणार का?

श्रीहरिकोटा येथील ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्था’ म्हणजे इस्रोने (ISRO) चंद्रयान 3 14 जुलै रोजी यशस्वीरित्या प्रक्षेपण पार पाडले.आता यशस्वी सेप्रेशननंतर मिशनचा अवघड टप्पा सुरु झाला आहे. लँडिंगच्या दिवसापर्यंत लँडिंग मॉड्युलवर वेगवेगळे मॅन्यूव्हर करण्यात येतील(Chandrayaan-3 update). इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रयान 3 मिशनचे ठरलेले सर्व टप्पे नियोजित वेळेस पूर्ण झाल्यास , (ISRO Moon Misson) सर्व काही ठरल्याप्रमाणे चंद्रयान 3 हे 23 ऑगस्टला संध्याकाळी 05 वाजून 47 मिनिटाला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग होऊ शकत.

 

 

हेही वाचा

भारताच्या ‘Chandrayaan-3’ च्या दोन दिवस अगोदर उतरणार, रशियाचं ‘लूना-25’ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर

 

join Our–  WHATSAPP GROUP  ,INSTAGRAM , TWITTER   ,  FACEBOOK PAGE– for every update