Chhatrapati Shivaji Maharaj Jagdamba Talwar | छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार भारतातून इंग्लंडमध्ये पोहोचली कशी?

Chhatrapati Shivaji Maharaj Jagdamba Talwar: छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं पुन्हा मायदेशी परत येणार असल्याची चर्चा आहे. देशातील नागरिकांना मराठ्यांची शान असलेली जगदंबा तलवार (Jagdamba Talwar) केव्हा परत येणार याबाबत उत्सुकता आहे. .आता ही जगदंबा तलवार केव्हा आणि कशी परत येणार हे भारत आणि इंग्लंड सरकार ठरवणार आहे. भारताचे इंग्लंडशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे जगदंबा तलवार परत येण्यास काही अडचण येईल, असे वाटत नाही. इंग्लंड सरकार ही जगदंबा तलवार परत करेल. परंतु, ही जगदंबा तलवार इंग्लंडला गेली कशी. कोण ही तलवार घेऊन गेलेत.(jagdamba sword back to india)

ही गोष्ट 1875 सालची आहे.(Jagdamba Talwar)

महाराजांची जगदंबा तलवार ब्रिटिशला जाण्याची गोष्ट 1875 सालची आहे.  त्यावेळी प्रिन्स ऑफ वेल्स अल्बर्ट एडवर्ड सप्तम डिसेंबर महिन्यात भारतात आले होते. ते जुन्या शस्त्रांचे शौकीन होते. वेगळी शस्त्र दिसली की ते आपल्याकडे जमा करत. इंग्लंडच्या अधिकाऱ्यांनी तेव्हाच्या महाराजांवर शस्त्र प्रिन्स ऑफ वेल्सला भेट देण्यासाठी दबाव निर्माण केला. इंग्रजांच्या प्रभावाखाली असल्याने महाराज त्या भेटवस्तू प्रिन्स ऑफ वेल्सला देत होते. त्या भेटीदरम्यान प्रिन्स ऑफ वेल्स यांना सुमारे पाचशे शस्त्र भेट देण्यात आले होते.

मुंबईचे कनेक्शन नेमके काय?

प्रिन्स ऑफ वेल्स मुंबईत पोहचले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांची जगदंबा तलवार त्यांना भेट देण्यात आली. त्यावेळी महाराजांचे वंशज शिवाजी चतुर्थ होते. त्यांचे वय फक्त ११ वर्षे होते. त्यांनी जगदंबा तलवार प्रिन्स ऑफ वेल्स यांना भेट दिली. भेट दिली त्यावेळी तलवार खूप खराब झाली होती. हिरे-माणिक उखडले होते. म्यानही नव्हती. शस्त्रागारात ही जगदंबा तलवार पडली होती. प्रिन्स ऑफ वेल्सला भेट देण्यापूर्वी या तलवारीला चमकवण्यात आले. हिरे-माणिक लावण्यात आले. म्यानही तयार करण्यात आली. त्यावेळी प्रिन्स ऑफ वेल्स इंग्लंडमध्ये ही तलवार घेऊन गेले.

सध्या जगदंबा तलवार कुठे आहे? (Chhatrapati Shivaji Maharaj Jagdamba Talwar)

ही जगदंबा तलवार इंग्लंडच्या राणी व्हिक्टोरीया यांच्या सेंट जेम्स पॅलेसमधील खासगी संग्रहालयात ठेवली आहे. दोन वर्षांपूर्वी याची माहिती झाली. महाराष्ट्र सरकार ही जगदंबा तलवार परत आणण्यासाठी इंग्लंड सरकारशी बोलणी करत आहेत. केंद्र सरकारच्या प्रयत्नामुळे आतापर्यंत 250 वस्तू इंग्लंडवरून परत आणण्यात आल्या.

त्यावेळेस छत्रपतीची उपाधी कोणाकडे होती?

छत्रपती शिवाजी महाराज यांचा मुलगा संभाजी महाराज यांची औरंगजेबाने हत्या केली. त्यानंतर त्यांचा दुसरा मुलगा राजाराम यांना छत्रपतीची उपाधी मिळाली होती. संभाजी महाराज आणि राजाराम भाऊ होते. शिवाजी चतुर्थ हे छत्रपती राजाराम यांचे वंशज होते.

 

Chhatrapati Shivaji Maharaj यांची वाघनखं पुन्हा मायदेशी परतणार ती कायमची की फक्त काही काळासाठी?

 

हेही वाचा 

 गणेश जन्मोत्सवाच्या 10 दिवसांसाठी या 10 गोष्टी अर्पण करा, तुम्हाला बाप्पाचा आशीर्वाद मिळेल.

 

join Our–  WHATSAPP GROUP  ,INSTAGRAM , TWITTER   ,  FACEBOOK PAGE– for every update

1 thought on “Chhatrapati Shivaji Maharaj Jagdamba Talwar | छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार भारतातून इंग्लंडमध्ये पोहोचली कशी?”

Leave a Comment