Covid New Variant : चिंता वाढली! मुंबईत कोरोनाच्या नव्या एरिस व्हेरियंटचा पहिला रुग्ण, लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करु नका

Covid New Variant : जगभरामध्ये कोरोनाने काही दिवसापासून सुटी दिली होती ,पण अजून कोरोना पूर्णपणे संपलेला नाही.( Eris Covid New Variant) सध्या नव्या कोरोना व्हेरियंटच्या रुग्णाची संख्या ब्रिटनसह काही देशांमध्ये काही दिवसांपूर्वीच एरिस कोरोना व्हेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे.याची भीती असतानाच आता भारतामध्ये नव्या कोरोना व्हेरियंटचा रुग्ण सापडला असल्यामुळे चिंता वाढली आहे. त्यामध्ये आता महाराष्ट्र मध्ये डोळ्यांची साथ मोठ्या प्रमाणात सुरु असताना ,आता मात्र, महाराष्ट्रात कोरोनाचा नवीन धोकादायक असा एरिस व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

महाराष्ट्रत कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा पहिला रुग्ण  

महाराष्ट्रमध्ये मुंबई येते, कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचा (Covid New Variant)रुग्ण आढळून आल्याने धोका वाढला आहे. नवीन कोरोना  व्हेरियंटच्या रुग्णनी सध्या ब्रिटनमध्ये चिंता वाढवली असून अनेक कोरोनाबाधित रुग्णालयात दाखल झाले आहेत.एरिस व्हेरियंट कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराचा सबव्हेरियंट-EG.5.1 आहे. यालाच एरिस (ERIS) असाही म्हटले जात आहे.

 

याआधी हि आढळला होता रुग्ण

बीजे मेडिकल कॉलेजचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार, याआधी मे महिन्यात महाराष्ट्रात नवीन एरिस व्हेरियंटचा पहिला रुग्ण सापडला होता . त्यानंतर मात्र जून आणि जुलै या दोन महिन्यात रुग्ण नवीन सापडलेला नाही.

हे सुद्धा वाचा.

New Covid Variant :पुन्हा कोरोनाचा धोका! कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा वेगाने प्रसार, ERIS ने जगाची चिंता वाढवली

 

नव्या व्हेरियंटचे लक्षणे काय आहेत?

मीडिया रिपोर्टनुसार,ओमायक्रॉन सारखीच कोरोनाच्या (ERIS Covid New Variant symptoms) व्हेरियंटची मुख्य लक्षणे आहेत.यामध्ये कोरडा खोकला,नाक चोंदणे,नाक वाहणे, घसा खवखवणे,शिंका येणे,कफ असलेला खोकला,वास कमी होणे आणि स्नायू दुखणे.दरम्यान कोरोना रुग्णांमध्ये वास कमी होणे,दम लागणे आणि ताप येणे ही आता मुख्य लक्षणे राहिले नाहीत. सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे कोविड प्रकरणांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.  असे मत वॉर्विक विद्यापीठातील विषाणूशास्त्रज्ञ प्रोफेसर लॉरेन्स यंग यांनी व्यक्त केले आहे.

 

पुन्हा कोविड लाट येणार का?

सध्या कोविड-19 मुळे ब्रिटनमध्ये रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण प्रति 100,000 लोकसंख्येमागे 1.97 टक्के इतके प्रमाण आहे. देशामध्ये प्रत्येक सात रुग्ण कोरोना संक्रमितांपैकी एका रुग्णास नवीन व्हेरियंटची (एरिस) लागण होत असल्याचे, UKHSA च्या अहवालानुसार हि माहिती मिळाली आहे. तज्ज्ञांच्या मते, नवीन व्हेरियंटची(New Covid Variant) ब्रिटनसह अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कोविड लाट येण्याची शक्यता आहे.

 

 

join Our–  WHATSAPP GROUP  ,INSTAGRAM , TWITTER   ,  FACEBOOK PAGE– for every update 

Leave a Comment