Crime News: नवरीला घेऊन तो पहिल्यांदाच पिक्चर पहायला गेला; इंटरव्हलमध्ये नवरी गेली पळून;

Crime News : लग्न सोहळा प्रत्येकाच्याच आयुष्यातील अविस्मरणीय असा क्षण असतो. सप्तपदी घेतल्यानंतर सुखी संसाराची स्वप्न पाहिली जातात. जयपुरमध्ये एका तरुणाच्या स्वप्नांचा एका क्षणात चुराडा झाला आहे. लग्नामुळे त्याचे आयुष्यचं उद्धवस्त झाले आहे. लग्नानंतर हा तरुण नव्या नवरीला घेऊन तो पहिल्यांदाच पिक्चर पहायला गेला. पण, सिनेमागृहातच त्याच्या लग्नाचा द एंड झाला. कारण,  इंटरव्हलमध्ये त्याची बायको त्याला सोडून पळून गेली.

 

पतीची पोलिस ठाण्यात तक्रार:

रिंगास सीकर येथे राहणाऱ्या 33 वर्षीय तरुणासह हा प्रकार घडला आहे. सात दिवसांपूर्वी या तरुणाचे लग्न झाले होते. पण लग्नानंतर त्याने पत्नीला जयपूरमध्ये अनेक ठिकाणी फिरायला नेले. यानंतर तो तिला घेवून सिनेमा पहायला गेला. मात्र, त्याची पत्नी सिनेमागृहातून अचानक बेपत्ता झाली. त्याने याबाबत  आदर्श नगर पोलिस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे .

 

नेमकं काय घडलं?

तक्रारदार तरुण हा आपल्या पत्नीला घेवून  पिंक स्क्वेअर मॉल  मध्ये सिनेमा पहायला गेला होता. 12 ते 3 अशा पिक्चरचा शो होता. दीडच्या सुमारास पिक्चरचा इंटरव्हल झाला. इंटरव्हलमध्ये ही नवी नवरी पाण्याची बॉटल आणण्यासाठी थिएटरच्या बाहेर गेली. बराचवेळ वाट पाहिली. मात्र, पत्नी काय पाण्याच्या बॉटल घेवून आली नाही. यामुळे थिएटरमध्ये सर्वत्र तिचा शोध घेतला मात्र, ती कुठेच दिसली नाही असे तरुणाने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे.

 

नव्या नवरीचा खुलासा

इंटरव्हलमध्ये पतीची नजर चुकवत ती पळवून गेली.  तपासादरम्यान ती जयपूर बस स्थानकात गेली होती. येथून तिने दिल्लीला जाणारी बस पकडली. दिल्लीत पोहचल्यानंतर ती आपल्या माहेरी गेली. तरुणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्या पत्नीचा शोध घेतला.  शहापुरा पोलीसांनी ही बेपत्ता झालेली नववधू सापडल्याचे आदर्श नगर पोलिसांना सांगितले. यानंतर ती स्वत: शहापुरा पोलीस ठाण्यात हजर झाली. बेपत्ता होण्यामागचे कारण तिने पोलिसांना सांगितले.  हे माझे लग्न मनाविरुद्ध झाले आहे. यामुळे मला नवऱ्यासोबत  रहायचे नाही असे तिने पोलिसांना सांगितले.

Leave a Comment