Crime News:आई-बाप यांनी असे काही केले कृत्य…आयफोनच्या हव्यासापोटी त्यांनी चक्क काळजाच्या तुकड्याचाच केला सौदा ! अवघ्या 8 महिन्यांच बाळ…

Crime News :तुटपुंज्या उत्पन्नातून जीवनावश्यक वस्तू मिळवण्याची धडपड बरेच करतात. त्यातील काही जण मेहनत करून स्वत:च जीवन सुधारण्याचा, राहणीमान उंचावण्याचा प्रयत्न करतात. पण तुमचं रक्त विकून ॲपलचा लोगो असलेला महागडा फोन विकत घेण्याचा विचार कसा वाटतो ? वाचून विचित्र वाटलं ना, पण प्रत्यक्षात असंच नव्हे तर याहूनही भयानक आणि धक्कादायक प्रकरण (crime news) घडलं आहे. पश्चिम बंगालमध्ये एका जोडपं आयफोनच्या (iPhone) हव्यासापोटी एवढ्या खालच्या थराला गेलं की त्यांनी चक्क त्यांच्या काळजाचा तुकडाच, दुसऱ्याला विकला.

 

हृदय पिळवटून टाकणारी ही घटना पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यात घडल्याचे समोर आले आहे. बंगालच्या विविध भागात फिरताना इन्स्टाग्रामवर रील बनवण्यासाठी त्यांना आयफोन 14 विकत घ्यायचा होता, आणि त्यासाठी त्यांनी आपल्या अवघ्या 8 महिन्यांच्या बाळालाच विकल्याचे समोर आले आहे. पश्चिम बंगाल पोलिसांनी या प्रकरणी एका महिलेला अटक केली आहे, मात्र बाळाचा पिता, मिस्टर. घोष हे अद्याप फरार असून पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

कसं उघड झालं प्रकरण ?

घोष दांपत्याच्या वागण्यात, राहणीमानात अचानक बदल झाल्याचे त्यांच्या शेजाऱ्यांच्या लक्षात आले होते. तसेच त्यांचं अवघं 8 महिन्यांच बाळही कित्येक दिवसांपासून गायब होत, तरीही त्यांच्या चेहऱ्यावर कुठलाच ताण, चिंता दिसत नव्हती. त्यातच जे जोडपं पऱ्याच महिन्यांपासून आर्थिक तंगी सहन करत होतं त्यांनीच महागडा आयफोन 14 विकत घेतल्याचेही शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यानेही त्यांच्या भुवया उंचावल्या.

या सगळ्याचा आणि त्यांचं बाळ गायब होण्याच्या घटनेचा काही परस्परसंबंध असू शकतो का, असं वाटल्याने त्यांनी बाळाच्या आईकडे कसून चौकशी केली असता तिने तिच्या कृत्याची कबूली दिली. आयफोन विकत घेण्यासाठी पैसे हवे होते आणि त्यासाठीच आपण व पतीने मिळून आपलं लहान बाळ विकलं असं तिने कबूल केलं. बंगालच्या विविध भागांत फिरताना इन्स्टाग्राम रील्स बनवण्यासाठी आयफोन हवा होता, आणि त्याच हव्यासापोटी त्यांनी हे लांछनास्पद कृत्य केलं.

आणखी एक धक्कादायक खुलासा

एवढंच नव्हे तर याआधीही मिस्टर. घोष यांनी पैशांसाठी त्यांच्या सात वर्षांच्या मुलीला विकण्याचाही प्रयत्न केला होता, अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे(crime news). पोलिसांनी याप्रकरणी दांपत्याविरोधात गुन्हा दाखल केला असून ज्यांनी ते बाळ विकत घेतलं त्या महिलेवरही मानवी तस्करीचा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत असून फरार असलेल्या मि.घोष यांचा कसून तपास केला जात आहे.

Leave a Comment