Dementia सतत बसणाऱ्यांना हा होत आहे आजार, तुम्ही तर नाहीत ना “या” आजाराने त्रस्त

Dementia : सतत बसून काम केल्याने अनेक आजार होण्याची शक्यता असते. जसे तणाव, लठ्ठपणा, पचनक्रिया संबंधित आजार आणि मानसिक आजार. जे लोक 10 तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ बसतात त्यांना डिमेंशिया नावाच्या आजाराचा धोका असतो.डिमेंशिया म्हणजेच स्मृतिभ्रंश आहे. आजकाल तरुणांना नोकरीत चांगली कामगिरी करण्यासाठी तासनतास संगणकासमोर एका जागी बसावे लागते. ही दिनचर्या जास्त दिवस चालू राहिल्यास स्मृतिभ्रंशाच्या बळी जाण्याची शक्यता वाढते.डिमेंशिया (Dementia) हा असा आजार आहे ज्यामध्ये आपण गोष्टी विसरतो. एखाद्याला ओळखण्यात अडचण येते. मेंदूवर ताण देऊन सुद्धा समोरच्या व्यक्तीचे नाव आठवत नाही . पूर्वी हा आजार 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वृद्धांना होत असे, परंतु आता खराब जीवनशैलीमुळे तरुणांनाही या आजाराची लागण होत आहे.(Dementia is a disease that happens to people who sit constantly)

अहवाल काय म्हणतो?

युनिव्हर्सिटी ऑफ साउदर्न कॅलिफोर्निया (University of Southern California) आणि युनिव्हर्सिटी ऑफ ऍरिझोना (University of Arizona) त्यांच्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, जे लोक एका जागी 10 तासांपेक्षा जास्त वेळ बसतात त्यांना स्मृतिभ्रंश होण्याचा धोका 8 टक्के जास्त असतो. जे लोक 12 तास बसून काम करतात त्यांना स्मृतिभ्रंश होण्याची शक्यता 63 टक्के असते. त्यामुळे जे लोक कॉम्प्युटर वापरत आहेत, व्हिडीओ गेम खेळत आहेत, ड्रायव्हिंग करत आहेत, टीव्ही पाहत आहेत किंवा बसून तेच काम जास्त वेळ न हलता करत आहेत त्यांना वेळीच सावध व्हावं लागेल. या अभ्यासाचे आकडे भितीदायक आहेत.

Dementia
-Dementia…(pc..newsinheadline)

 

डिमेंशिया(Dementia) पासून कशा प्रकारे स्वतःचे रक्षण कराल?

जर तुम्हाला स्वतःमध्ये डिमेंशियाची (Dementia) लक्षणे दिसली तर वेळीच सावध व्हा आणि व्यायाम करा. मानसिक व्यायामावर लक्ष केंद्रित करा आणि एका जागी जास्त वेळ बसू नका. कामाच्या दरम्यान थोडा वेळ विश्रांती घ्या आणि फिरायला जा. संतुलित आहार घ्या. चांगले संगीत ऐका. नृत्य करा आणि पुस्तक वाचा. विसरण्याची समस्या सतत वाढत असेल तर तुम्ही चांगल्या मानसिक तज्ञांचीही मदत घेऊ शकता. वेळीच सावध राहणे हाच एक उपाय आहे.(How to protect yourself from dementia?)

डिमेंशिया म्हणजे काय? | What is Dementia in Marathi

डिमेंशिया(Dementia) म्हणजेच स्मृतिभ्रंश हा एक सिंड्रोम आहे. जेव्हा तुमची स्मरणशक्ती तुमचा निर्णय, भाषा व इतर कौशल्यांमध्ये बाधा आणते तेव्हा तिला डिमेंशिया म्हणतात. डिमेंशिया (स्मृतिभ्रंश) या आजारामध्ये मेंदूची क्षमता हळूहळू कमी होते. तसेच स्मरणशक्ती, विचारशक्ती कमी होते. त्यामुळे वागण्यात व स्वावलंबनावर परिणाम होतो. हा आजार हळूहळू वाढत जातो व रुग्ण परावलंबी होतात.

 

हेही वाचा 

 

Suicidal Thoughts : एखाद्याच्या मनात आत्माहत्येचे विचार आहेत हे कसे ओळखाल? जाणून घ्या ही काही लक्षणे आणि त्यावरील उपाय

Leave a Comment