Dhananjay Munde : शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी पाच विधेयक, कृषीमंत्री धनंजय मुंडेंची माहिती

Dhananjay Munde : शेतकऱ्यांची फसवणूक आणि बोगस बियाणे,खते,कीटकनाशे या सर्व गोष्टीवर आळा खालण्यासाठी विधेयके राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी (Agriculture Minister Dhananjay Munde) विधानसभेत सादर केली आहेत. धनंजय मुंडेंनी याबाबतची घोषणा सुरवातीलाच केली होती.तसेच बोगसगिरी करणाऱ्यांना दंड लावण्यापासून ते जाणीवपूर्वक असे गुन्हे करणाऱ्यांविरुद्ध एमपीडीए(MPDA) सारखे कलम लावण्याची तरतूद विधेयकांमध्ये करण्यात आल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली.यासंदर्भात एकूण पाच विधयेके मांडली आहेत.

 

ही पाच विधेयके सादर 

पाचही विधेयके दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीकडे विचारार्थ पाठवण्यात आली आहेत,कायदे व्यापक शेतकरी हितार्थ व्हावेत यादृष्टीने अधिक चर्चा होऊन मंजूर केले जावेत. येणाऱ्या अधिवेशनात हे कायदे पारित केले जातील. विक्रेते आणि प्रामाणिक निर्माते यांना कोणताही त्रास होणार नाही.याची काळजी पूर्णपणे घेतली जातील.असेही धनंजय मुंडे यांनी सांगितले.धनंजय मुंडे यांनी एकूण 5 विधेयके विधानसभेत सादर केली आहेत. यामध्ये गैर छापाची  बियाणे, खते किंवा कीटकनाशके यांच्या विक्रीमुळे झालेल्या नुकसानी करिता तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी विधेयके-2023, महाराष्ट्र बियाणे अधिनियम 1966 मध्ये सुधारणा विधेयक 2023, महाराष्ट्र कीटकनाशके कायदा 1968 मध्ये सुधारणा विधेयक 2023, अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 मध्ये सुधारणा करणे. याचसोबत महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टी वाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, अत्यावश्यक सेवा, वस्तूंचा काळाबाजार करणारे व्यक्तीवर आळा घालण्यासाठी अधिनियम 1981(MPDA) यामध्ये सुधारणा करणे हे पाच विधेयके सादर करण्यात आले आहेत.

 

दोन्ही सभागृहाच्या विधेयके विधिमंडळाच्या संयुक्त समितीकडे

महाराष्ट्र राज्यामध्ये बोगस बियाणे खते कीटकनाशके, हा प्रकार अत्यंत गंभीर आहे यासंदर्भात मांडलेली पाचही विधायक हे व्यापक आहेत. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच बोगस बियाणे खते कीटकनाशके आधीच्या विक्रीवर कायमस्वरूपी प्रतिबंध घालणारा कायदा आणण्याची घोषणा केली होती. त्यानुसार त्यांनी काल (4 )ऑगस्टला ही पाच ही विधेयके विधानसभेत सादर केली आहेत. सखोल चर्चा करून आणि शेतकऱ्यांच्या फायद्यांचा विचार करून हे कायदे अमलात आणले पाहिजेत असे (Dhananjay Munde)मुंडे म्हणाले.

यादृष्टीने दोन्ही सभागृहाच्या विधेयके विधिमंडळात 25 सदस्यांच्या संयुक्त समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या समितीचे अध्यक्ष कृषीमंत्री असतील तर संयुक्त समितीत विधानसभेचे 17 तर विधानपरिषदेचे 8 सर्वपक्षीय सदस्य असतील

 

चर्चा करून आवश्यक ते बदल करण्यात येणार

या पाचही विधेयकाबाबत संयुक्त समिती या बैठका घेऊन प्रस्तावित बदल व अतिरिक्त आवश्यक बदल यावर साधक बाधक चर्चा करणार आहेत. हिवाळी अधिवेशनापूर्वी महाराष्ट्रातील बोगस खाते बियाणे आणि कीटकनाशके यांचा काळाबाजार रोखण्यासाठी आवश्यक असा प्रभावी आणि सक्षम कायदा तयार करण्यात येणार आहे. दरम्यान,हे जे करताना विक्रेते आणि प्रामाणिक उत्पादक यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, यांची सर्व काळजी घेतली जाईल. असे आश्वासन कृषी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde)यांनी दिली आहे.

 

 

 

1 thought on “Dhananjay Munde : शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी पाच विधेयक, कृषीमंत्री धनंजय मुंडेंची माहिती”

Leave a Comment