Agriculture Department:याला लॉटरी सिस्टीम नाही, मागेल त्याला मिळणार; कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचा मोठा निर्णय

Agriculture Department : मागेल त्याला शेततळे आणि मागेल त्याला ड्रीप अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. कृषी विभागात(Agriculture Department) जे काही ऑनलाईन अर्ज येतात, त्याची १०-१० हजाराप्रमाणे लॉटरी सिस्टीम काढली जाते. आता मागेल त्याला शेततळे मिळणार. कारण शासन मागणाऱ्याला शेततळे देणार आहे. जो शेतकरी ड्रीप मागेल त्याला सरकार ड्रीप देणार आहे. यात कुठलीही लॉटरी सिस्टीम राहणार नाही. तीन लाख शेतकऱ्यांनी ड्रीप आणि शेततळ्याची मागणी केली आहे. मागणाऱ्या प्रत्येकाला ड्रीप आणि शेततळे द्यावे, असा निर्णय राज्याचे कृषीमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांनी घेतला.

 

मागेल त्याला शेततळे आणि ड्रीप हा आजच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला असल्याचंही धनंजय मुंडे यांनी सांगितलं. यासाठी कुठल्याही लॉटरी सिस्टीममधून जाण्याची गरज नाही.

 

कृषी विभाग (Agriculture Department)तालुकानिहाय रिपोर्ट देणार

पर्जन्यमान लांबलं आहे. तीन-चार दिवसांत काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. काही ठिकाणी पाऊस कमी झाला. २२ ते ३० जुलैपर्यंत सोयाबीन पेरण्या करता येतील. तसेच दुबार पेरणीची गरज पडल्यास कृषी विभाग रिपोर्ट तालुकानिहाय रिपोर्ट देणार आहे.

शेतकऱ्यांनी पीकविमा काढण्याचे आवाहन

एक रुपयांची पीक विमा योजनेचा फायदा जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी घेणे गरजेचे आहे. शेतकरी कमी पडत आहे. याचा पूर्ण फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा, असं आवाहन धनंजय मुंडे यांनी केला.

हे सुद्धा वाचा

Ajit Pawar :अजित दादांचा बोलबाला, राष्ट्रवादीची चांदीच चांदी, जवळपास सर्वच मंत्र्यांना मोठी जबाबदारी मिळणार?

शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळावे

हमीभावापेक्षा जास्त रक्कम मिळाली तर चांगली गोष्ट आहे. टमाटरबाबत काही जणांनी आंदोलन सुरू केली. काही मोठ्या अभिनेत्यांनी टमाटर खाल्ले नाही तर शरीरातील प्रोटीन व्हॅल्यू कमी होणार नाही. शेतकऱ्याला दोन पैसे जास्त पैसे मिळाले, तर वेगळं राजकारण होऊ नये, अशी माझी इच्छा असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले.

 

 

आमदार असताना बियाणं वाटपासंदर्भात सर्वात अगोदर तत्कालीन मंत्र्यांना पत्र लिहीलं. मंत्र्यांनी बोगस बियाण्यांवर कारवाया सुरू केल्या. बोगस बीयाणं कुठल्याही शेतकऱ्यांपर्यंत पोहचू नये. बोगस बीयाणांचा कुणी धंदा करत असेल, तर त्याला उठवण्याची जबाबदारी कृषी विभागाने(Agriculture Department) स्वीकारली असल्याचंही धनंजय मुंडे यांनी सांगितलं.

1 thought on “Agriculture Department:याला लॉटरी सिस्टीम नाही, मागेल त्याला मिळणार; कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचा मोठा निर्णय”

Leave a Comment