Elon Musk: इलॉन मस्क आता ट्विटरची ‘चिमणी’ बदलणार… नव्या रंगात आणि नव्या लोगोसह Twitter येणार यूजर्सच्या भेटीला

Elon Musk Twitter Latest News: सातत्याने काहीतरी नवीन करायचा छंद असलेल्या इलॉन मस्क यांने आता ट्विटरचे रंगरूप बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ट्विटरचा लोगो असलेली चिमणी आता बदलणार असून त्यासोबत त्याचा निळा रंगही बदलण्यात येणार आहे.

इलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यापासून कंपनीत सतत काहीना काही बदल करत आहेत. त्यामुळे त्याचे कौतुक आणि टीकाही झाली. आता इलॉन मस्क ट्विटरची ओळख बदलणार आहे. वास्तविक इलॉन मस्क ट्विटरचा लोगो म्हणजेच बर्ड हटवण्याच्या तयारीत आहे. त्याने ट्विट (Elon Musk Tweet) केले की, “लवकरच आम्ही ट्विटर ब्रँडला आणि हळूहळू सर्व पक्ष्यांना हटवू.”

 

 

दुसर्‍या ट्विटमध्ये,  इलॉन मस्क म्हणतो की, “आज रात्री एक छान X लोगो पोस्ट केला गेला तर, आम्ही तो उद्या जगभरात लाइव्ह करू.” याआधीही मस्कने ट्विटरच्या धोरणात अनेकवेळा बदल केले आहेत, ज्याचा थेट परिणाम जगभरातील वापरकर्त्यांवर झाला आहे.

 

 

Twitter Rebranding News : X बर्डची जागा घेईल?

आता इलॉन मस्कने ट्विटरचा लोगो बदलण्याचे संकेत दिल्याने अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की, नवीन लोगो कसा असेल? असा अंदाज वर्तवला जात आहे की इलॉन मस्कने त्याच्या बहुतेक कंपन्यांच्या नावांमध्ये आणि लोगोमध्ये X या शब्दाचा समावेश केला आहे. त्यामुळे ट्विटरच्या नवीन लोगोवर देखील Xचे वर्चस्व असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अलीकडेच इलॉन मस्कने लॉन्च केलेल्या एका आर्टिफिशिअर कंपनीला xAI असे नाव देण्यात आले आहे. त्याच वेळी मस्कच्या स्पेस एक्सप्लोरेशन टेक्नॉलॉजीज कॉर्पोरेशन कंपनीचे नाव देखील स्पेसएक्स आहे. आता मस्क देखील X या शब्दाने ट्विटर बर्ड लोगो बदलण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे. त्याने ट्विटमध्ये लिहिलंय की, लोगो कसाही असेल पण त्यात X असेल.

Twitter News Update : यूजर्सनी नवीन लोगो सूचवला

इलॉन मस्कने रविवारी सकाळी 9.30 वाजता हे ट्विट केले आहे. या नव्या घोषणेनंतर त्याचे ट्विट आतापर्यंत तीन कोटीहून अधिक यूजर्सनी पाहिले आहे. या ट्विटवर अनेक यूजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आणि लोगोसंदर्भात विविध मीम्स शेअर केले.

अलीकडेच इलॉन मस्कने नवा नियम बनवला आहे, ज्याच्या अंतर्गत साइन इन न केलेले लोक ट्विट पाहू शकणार नाहीत. यापूर्वी, यूजर्सचे प्रोफाइल किंवा ट्विट पाहण्यासाठी ट्विटरवर खाते तयार करण्याची गरज नव्हती. मस्क यांनी या नियमाबाबत युक्तिवाद केला की ट्विटरमधून इतका डेटा येत आहे की सामान्य वापरकर्त्यांच्या सेवांवर नकारात्मक परिणाम होत आहे.

1 thought on “Elon Musk: इलॉन मस्क आता ट्विटरची ‘चिमणी’ बदलणार… नव्या रंगात आणि नव्या लोगोसह Twitter येणार यूजर्सच्या भेटीला”

Leave a Comment