Eyes Flue,सावधान ! लहान मुलांना शाळेत पाठवत असाल तर, हि बातमी नक्की वाचा…

राज्यामध्ये सर्वत्र डोळ्यांची साथ(Eyes Flue) सुरू आहे. आता हे लहान मुलापासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत सर्वांना डोळ्याची साथ येत आहे. संसर्गजन्य आजार असल्यामुळे एकमेकांच्या संपर्कात आल्यास हा आजार होतो. यामुळे या आजारामध्ये लहानापासून ते मोठ्यापर्यंत रुग्ण आढळत आहेत. संसर्गजन्य चे प्रमाण शाळेमध्ये वाढत आहे. त्यामुळे शाळेतील एकूण पटसंख्यापैकी गैरहजेरीचे प्रमाण वाढत आहे .

 

पालकांनीही मुलांचे डोळे (Eyes Flue)येण्यापूर्वी योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. शाळेतील मुलं एकत्र येत असल्यामुळे संसर्ग चे प्रमाण वाढत आहे. तसेच शिक्षक ही विद्यार्थ्यांना सूचना करीत आहेत की, डोळे आल्यास शाळेत येऊ नका. खाजगी शाळा असो किंवा जिल्हा परिषद शाळा असो सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या कमी झालेली आहे. काही पालक डोळे आल्यामुळे आपल्या पाल्याला शाळेत पाठवणार नाहीत असे सांगत आहेत. डोळे आल्यास मुले घरी राहिल्यास संसर्ग लवकर बरा होऊ शकतो.

 

लहान मुलांमधील डोळ्याची साथ

वातावरणातील बदलामुळे डोळे येण्याची साथ वाढू(Eyes Flue) लागलेली आहे. शाळेत व शिकवणीच्या वर्गात एकत्रित एकमेकाचा संपर्क वाढत असल्यामुळे संसर्ग होतो. डोळे येत असल्यास एकमेकांपासून जवळ राहण्यापेक्षा दूर राहिल्यास संसर्ग कमी करण्यास मदत होतो.

 

डोळे येण्याचे लक्षणे:

  • डोळ्यात थोडा चिकटपणा येतो
  • डोळ्यास सूज यायला सुरुवात होते
  • डोळे हलके लाल व्हायला सुरू होतात
  • डोळ्यात वारंवार खाज येते
  • डोळ्यातून पाणी यायला लागते

 

शाळेतील उपस्थितीचे प्रमाण कमी झाले

डोळे आल्याची साथ गंभीर नसून संसर्गजन्य असल्यामुळे गावोगावी रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे विद्यार्थी शाळेत जात नाहीत. यामुळे शाळेतील उपस्थित चे प्रमाण कमी झाले आहे.

 

डोळे आल्यास मुलाला शाळेत पाठवू नका

पालक मुलांचा अभ्यास होत नाही म्हणून शाळेत नाही पाठवता घरी बसून अभ्यास घेणे सुरक्षित राहील. कारण संपर्क वाढल्यास संसर्ग शक्यता आहे.

डोळ्याचा आजार हा सौम्य व संसर्गजन्य (Eyes Flue)असल्यामुळे या आजाराची लक्षणे आढळून आल्यास आपल्या जवळच्या आरोग्य केंद्र ,सरकारी रुग्णालयात किंवा वैयक्तिक सल्ला व उपचार घ्यावा. रोगाचा प्रसार होणार नाही त्यामुळे चादरी आणि टॉवेल यांचा स्वतंत्र वापर करावा. डोळ्यास वारंवार हात लावणे टाळावे. तसेच नियमित हात धुणे आवश्यक आहे. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेणे आवश्यक आहे ही माहिती नेत्रविकार तज्ञ डॉ. ऋषी खडपे यांनी दिली आहे.

 

join Our–  WHATSAPP GROUP  ,INSTAGRAM , TWITTER   ,  FACEBOOK PAGE– for every update 

1 thought on “Eyes Flue,सावधान ! लहान मुलांना शाळेत पाठवत असाल तर, हि बातमी नक्की वाचा…”

Leave a Comment