फेसबुक मेसेंजर यूजर्सना धक्का, पुढील महिन्यापासून बंद होणार हे फीचर

सोशल मीडिया वर लाखो व्यक्ती सक्रिय असतात .तसेच फेसबुक आणि फेसबुक मेसेंजर,या दोन्ही अँपचे लाखो ऍक्टिव्ह यूजर्स आहेत.फेसबुक वर मेसेज करण्यासाठी फेसबुक मेसेंजरचा वापर लाखो यूजर्स करायचे.आता अशा परिस्थितीत फेसबुक कंपनीकडून मेसेंजरवरून काही फीचर कडून टाकण्यात आले आहेत. यामुळे यूजर्सना मोठा धक्का बसणार आहे. मेटा ने 2016 मध्ये Android स्मार्टफोन यूजर्ससाठी एसएमएस एकत्रीकरण वैशिष्ट्य प्रदान करण्यास सुरवात केली आहे. मात्र,आता 7 वर्षांनी म्हणजे 2023 साली हे वैशिष्ट्य बंद करण्यात येणार आहे.म्हणजेच आता फेसबुक मेसेंजरवरून एसएमएस सपोर्ट फीचर लवकरच बंद करणार आहे.

 

सध्या यूजर्स वापरात असणाऱ्या फेसबुकवर आलेले मेसेज आणि एसएमएसमध्ये आलेले मेसेज अँप मध्ये पाहू शकतात. मेसेंजरमध्ये एसएमएस आता जांभळ्या रंगात दिसतात.तर फेसबुकवरील मित्रांचे संदेश मेसेंज हे निळ्या रंगात दिसतात.आता मेटाने अशी माहिती दिली आहे कि,हे फीचर 28 सप्टेंबर 2023 पासून बंद केले जाईल.म्हणजेच पुन्हा त्यानंतर मेसेंजरमध्ये आलेला एसएमएस पाहता येणार नाही.

 

त्यानंतर SMS साठी तुम्हाला फक्त फोनचे डिफॉल्ट मेसेजिंग अँपचा वापर करावे लागेल. कारण Meta ने दिलेल्या माहितीनुसार 28 सप्टेंबर नंतर, Android स्मार्टफोन वापरणारे वापरकर्ते सेल्युलर नेटवर्कद्वारे एसएमएस पाठवण्याची आणि प्राप्त करण्याच्या सुविधेचा आनंद घेऊ शकणार नाहीत.

 

मेटाने (Meta) ने स्पष्ट सांगितले आहे की,जर यूजर्सने नवीन डीफॉल्ट मेसेजिंग अँपचा वापर केला नाही तर, एसएमएस स्वयंचलितपणे Google संदेश अँपमध्ये सेव्ह करण्यात येईल.बंद झाल्यानंतर हे दोनच पर्याय युजर्स समोर असतील.

 

मेटाने 2016 मध्ये Google Android Message आणि Apple i Message या दोन्हीच्या वैशिष्टयाची स्पर्धा करण्यासाठी SMS इंटिग्रेशन फीचर लाँच केले .या फीचरचा वापर सुरु केल्यानंतर यूजर्सना फेसबुक फ्रेंड्स आणि एसएमएस एकाच अँपमध्ये पाहू शकतात.

हेही वाचा..

भारत सेमीकंडक्टर हब बनणार! चिप प्लांटसाठी सरकार करणार 50 टक्के आर्थिक मदत, पंतप्रधानांची मोठी घोषणा

 

join Our–  WHATSAPP GROUP  ,INSTAGRAM , TWITTER   ,  FACEBOOK PAGE– for every update 

Leave a Comment