Farmer Success Story: सोयाबीन शेती करणाऱ्या शेतकऱ्याने रिस्क घेतली आणि आल्याची शेती केली! आता बनला कोट्याधीश

Farmer Success Story: शेतीमध्ये उत्पादन घेत असताना शेतकऱ्यांनी विकेल तेच पिकेल या तत्त्वाचा अंगीकार करणे खूप गरजेचे आहे. कारण नुसते पिकांची लागवड करून फायदा नसून कुठल्या पिकाला कोणत्या कालावधीमध्ये बाजार भाव चांगला राहील याचा तंतोतंत अभ्यास हा आपल्या परिसरातील भागातील शेतीचा व त्या ठिकाणी लागवड करण्यात आलेल्या पिकांचा  करता येतो.

कधी कधी काही शेतकरी तर कोणत्या भाजीपाला पिकाचे बियाणे जास्त विक्री झाली आहे याचा गावातीलच नाहीतर परिसरातील मोठ्या कृषी सेवा केंद्रातून व्यवस्थित तपास करून त्या पद्धतीने भाजीपाला लागवडीचे नियोजन करतात हे देखील तेवढे सत्य आहे. यामध्ये थोडा शेतकऱ्यांना त्रास पुरेल परंतु बाजारपेठेतील भावाच्या दृष्टिकोनातून पिकांच्या लागवड करण्याकरिता हा प्रयत्न नक्कीच फायद्याचा ठरेल.

 

आता आपण टोमॅटोचा विचार केला तर सध्या टोमॅटोचे दर उच्चांकी पातळीवर असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना लखपती नव्हेच तर करोडपती देखील टोमॅटो ने  यावर्षी केलेले आहे. परंतु यामागे जर आपण शेतकऱ्यांचा विचार केला तर काही शेतकरी सलग पाच ते सहा वर्षापासून टोमॅटो शेतीत नुकसानच सहन करत होते.

 

परंतु यावर्षी टोमॅटो ने शेतकऱ्यांचे मागचे पुढचे सगळे नुकसान भरून काढले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. अगदी याच पद्धतीने विचार केला तर टोमॅटो प्रमाणे सध्या आल्याचे दर देखील बाजारपेठेत 120 ते 150 रुपये प्रति किलो असे असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना त्यांच्या अपेक्षित असलेल्या उत्पन्नापेक्षा जास्त आर्थिक उत्पन्न मिळताना  दिसून येत आहे. अगदी याच पद्धतीने जर आपण विचार केला तर कळंब तालुक्यातील एका शेतकऱ्याने देखील अद्रक लागवड केलेली होती व या अद्रक लागवडीतून या शेतकऱ्याला लाखोचा फायदा झालेला आहे. त्यांचीच यशकथा आपण या लेखात बघणार आहोत.

 

या शेतकऱ्याने आल्याच्या शेतीतून कमावले अडीच एकर मध्ये 45 लाख रुपये

याबद्दलचे सविस्तर माहिती असे आहे  की, धाराशिव तालुक्यातील कळंब  तालुक्यातील गणेश पाटोळे या शेतकऱ्याने पारंपारिक शेतीला फाटा देत तब्बल अडीच एकर क्षेत्रावर आल्याची लागवड केली. परंतु यावर्षी आल्यामुळे या शेतकऱ्याचे नशीब फळफळुन आले. त्यांच्या आल्याला बाजारामध्ये प्रतिकिलोला सध्या 130 ते 150 रुपयाचा बाजार भाव मिळत असल्यामुळे त्यांना अडीच एकर क्षेत्रात लागवड केलेल्या आल्यापासून पंधरा लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल अशी एक अपेक्षा होती.

परंतु बाजार भाव चांगला मिळाल्यामुळे त्यांच्या या अपेक्षेपेक्षा जवळजवळ त्यांना तिप्पट म्हणजेच 45 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले व महत्त्वाचे म्हणजे आज देखील मार्केटमध्ये त्यांचा माल जात असून मिळणारा भावदेखील तितकाच मिळत असल्यामुळे हे उत्पन्न कोटींच्या घरात जाईल असे गणेश पाटोळे यांनी सांगितले.

जर आपण साधारणपणे धाराशिव जिल्हा किंवा मराठवाड्याचा एकंदरीत विचार केला तर हा पट्टा सोयाबीन उत्पादक पट्टा म्हणून ओळखला जातो. परंतु गणेश यांनी सोयाबीन पिकाची लागवड न करता म्हणजेच पारंपारिक पिकाला वेगळा पर्याय निवडून आद्रक उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला व हाच निर्णय त्यांना योग्य ठरला.

अगदी टोमॅटो प्रमाणेच आल्याला देखील या वेळेस बाजार भाव मिळत असल्यामुळे जे पिकते तेच कधीकधी खूप मोठ्या प्रमाणावर विकल जातं असं म्हणायची वेळ आली आहे. त्यामुळे बाजारपेठेचा अभ्यास हा फायद्याचा असतोच परंतु कधीकधी शेतकऱ्याला त्याचे नसीब देखील मोठ्या प्रमाणावर साथ देऊन गेले तर खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होतो हे या उदाहरणावरून दिसून येईल.

Leave a Comment