गौतमी पाटील(Gautami Patil)हिच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, ‘घुंगरू’ चित्रपट रखडला; कारण वाचाल तर…

राजकीय घडामोडींचा सिनेमावर परिणाम होऊ नये, प्रेक्षकांनी सिनेमाकडे पाठ फिरवू नये म्हणून या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. या राजकीय घडामोडीत गौतमीच्या सिनेमाची चर्चा होणार नाही.

 

Gautami Patil:आपल्या नृत्याने अवघ्या महाराष्ट्र भर प्रसिद्ध गौतमी पाटीलचे कार्यक्रम सध्या थांबलेले आहेत. पावसामुळे गौतमीच्या कार्यक्रमांना ब्रेक बसला आहे. गौतमीने गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्रात आपल्या अदाकारीने धुमाकूळ घातला होता. सर्वात व्यस्त कलाकार म्हणूनही ती पुढे आली होती. गौतमीचे कार्यक्रम म्हणजे गर्दी… गर्दी… आणि गर्दी… गौतमीचा कार्यक्रम म्हणजे गर्दी, टाळ्या, शिट्ट्या, हुल्लडबाजी, पोलिसांचा लाठीमार हे ठरलेलंच आहे. चाहत्यांच्या हुल्लडबाजीमुळे तर गौतमीचा कार्यक्रम कित्येकवेळा मध्येच थांबवावा लागला आहे. गौतमीची ही प्रचंड क्रेझ असल्यामुळेच तिला सिनेमाची ऑफर आली होती. तिने ती ऑफरही स्वीकारली. सिनेमा पूर्णही झालाय. पण सध्या तिच्या सिनेमाचं प्रदर्शन एका कारणामुळे रखडलं आहे.

 

 

गौतमी पाटीलने(Gautami Patil )घुंगरू या सिनेमात काम केलंय. सिनेमातील तिचा हा पहिलाच अभिनय आहे. त्यामुळे मोठ्या पडद्यावरील तिची अदाकारी पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत. तर आपल्या पहिल्यावहिल्या सिनेमाची गौतमीलाही उत्सुकता आहे. गौतमीने आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळात वेळ काढून हा सिनेमा पूर्ण केला आहे. सिनेमा तयारही झाला आहे. मात्र, सिनेमाचं प्रदर्शन लांबणीवर पडलं आहे. पावसाच्या दिवसामुळे किंवा महागाईच्या फटक्यामुळे गौतमीच्या सिनेमाचं प्रदर्शन लांबणीवर पडलेलं नाही.

 

गौतमी पाटीलने घुंगरू या सिनेमात काम केलंय. सिनेमातील तिचा हा पहिलाच अभिनय आहे. त्यामुळे मोठ्या पडद्यावरील तिची अदाकारी पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत. तर आपल्या पहिल्यावहिल्या सिनेमाची गौतमीलाही उत्सुकता आहे. गौतमीने आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळात वेळ काढून हा सिनेमा पूर्ण केला आहे. सिनेमा तयारही झाला आहे. मात्र, सिनेमाचं प्रदर्शन लांबणीवर पडलं आहे. पावसाच्या दिवसामुळे किंवा महागाईच्या फटक्यामुळे गौतमीच्या सिनेमाचं प्रदर्शन लांबणीवर पडलेलं नाही.

 

नवीन तारीख कळवणार

राज्यातील या राजकीय घडामोडीचा गौतमीच्या सिनेमावर परिणाम झाला आहे. या राजकीय घडामोडींमुळेच गौतमीच्या सिनेमाचं प्रदर्शन लांबणीवर गेलं आहे. राजकीय घडामोडींचा सिनेमावर परिणाम होऊ नये, प्रेक्षकांनी सिनेमाकडे पाठ फिरवू नये म्हणून या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

 

या राजकीय घडामोडीत गौतमीच्या सिनेमाची चर्चा होणार नाही. त्याचा फटका सिनेमाला बसू शकतो, अशी भीती असल्यानेच सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सिनेमाची तारीख पुढे ढकलली जात आहे. नवी तारीख लवकरच कळवू असं सिनेमाचे दिग्दर्शक बाबा गायकवाड यांनी सांगितलं आहे. त्यामुळे तिच्या सिनेमाच्या नव्या तारखेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Leave a Comment