Gautami patil movie release date:महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीं मुळे गौतमी पाटील हिच्या चित्रपटाला फटका?

Gautami patil movie release date late due to maharashtra political happenings:

गौतमी पाटील हिच्या ‘घुंगरु’ चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. पण तिचा चित्रपट अद्याप रिलीज झालेला नाही. याशिवाय या चित्रपटाची रिलीज होण्याची तारीख अद्याप समोर आलेली नाही. या चित्रपटाचे निर्माते बाबा गायकवाड यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

Gautami patil movie release date:

आपल्या नृत्याने संपूर्ण महाराष्ट्रावर अधिराज्य गाजवणारी सबसे कातील गौतमी पाटील सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. एखाद्या अभिनेत्रीला पाहायला उडणार नाही, एवढी झुंबड तिला पाहण्यासाठी उडत असते. एवढेच कशाला तिची एक झलक पाहण्यासाठी एवढी गर्दी होते, एवढी गर्दी होते की पोलिसांना जमावावर लाठीमार करावा लागतो. इतकी लोकप्रियता आणि असा प्रसंग क्वचितच एखाद्या अभिनेत्रीच्या वाट्याला आला असेल. तिची ही लोकप्रियता पाहूनच तिला मराठी सिनेमात घेण्यात आले. मराठी सिनेमात काम करण्याची गौतमीचीही इच्छा होती. तिनेही सिनेमा स्वीकारला. आपल्या नृत्याच्या कार्यक्रमातून वेळ काढत काढत तिने सिनेमात काम केलं. सिनेमा पूर्ण झाला आहे. त्याचा टिझरही लॉन्च झाला आहे. त्यामुळे अभिनेत्री होण्याचं गौतमीचं स्वप्नही साकार झालं आहे. त्यामुळेच आता तिच्या नावापुढे आता अभिनेत्री ही बिरुदावलीही जोडली गेली आहे.

Gautami patil movie release date late due to maharashtra political happenings:
Gautami patil movie release date late due to maharashtra political happenings:

 

डान्सर गौतमी पाटील (Gautami Patil) हिचा ‘घुंगरु’ चित्रपट लवकर प्रदर्शित होणार आहे. गौतमी पाटील हिच्या ‘घुंगरु’ चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. गौतमी पाटील हिने देखील अनेकदा या चित्रपटाविषयी माहिती दिली आहे. हा चित्रपट कलाकारांवर आधारीत आहे. तसेच या चित्रपटात प्रेम कहाणी आणि थ्रीलही बघायला मिळण्याची शक्यता आहे. गौतमीचे चाहते अनेक दिवसांपासून तिच्या या चित्रपटाची वाट पाहत आहेत. गौतमीचा हा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ती अभिनय क्षेत्र आणि चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. गौतमीच्या ‘घुंगरु’ चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. या चित्रपटाची रिलीज होण्याची तारीख ही महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींमुळे लांबवण्यात आली आहे, अशी माहिती चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिली आहे.

 

 

 

‘घुंगरु’ चित्रपटाचे निर्माते नेमकं काय म्हणाले?

‘घुंगरु’ चित्रपटाचे निर्माते, लेखक आणि दिग्दर्शक बाबा गायकवाड यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. “नमस्कार मी बाबा गायकवाड! घुंगरु चित्रपटाचा निर्माता, लेखक आणि दिग्दर्शक. घुंगरु हा पहिला मराठी चित्रपट आहे ज्याचं चित्रिकरण सात राज्यांमध्ये झालं आहे. या चित्रपटात गौतमी पाटील प्रमुख भूमिकेत आहे. तिचा हा पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे मला खूप अपेक्षा आहेत. हा चित्रपट सगळ्यांनी थिएटरला जाऊन सर्वांनी पाहावा, अशी माझी सर्वांना विनंती आहे”, अशी प्रतिक्रिया बाबा गायकवाड यांनी दिली.

“चित्रपटाचं काम पूर्ण झालं आहे. या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख ही पुढच्या आठ दिवसांत मी जाहीर करेन. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे थांबवलं आहे”, असं बाबा गायकवाड यांनी सांगितले आहे  . पण पुढच्या आठ ते दहा दिवसांत चित्रपट प्रदर्शनाची तारीख निश्चित होईल”, असंही बाबा गायकवाड यांनी सांगितलं आहे.

 

“चित्रपटाची कथा सांगून जमणार नाही. तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा. तुम्हाला स्टोरी नक्की आवडेल याचा मला विश्वास आहे”, असे  बाबा गायकवाड म्हणाले.

 

गौतमीच्या चित्रपटाची राज्याला उत्सुकता

गौतमी पाटील ही तिच्या नृत्यामुळे राज्यभरात प्रसिद्ध झाली आहे. राज्यभरात गौतमीचे लाखो चाहते आहेत. त्यामुळे गौतमीच्या कार्यक्रमाला हजारो चाहते गर्दी करतात. सबसे कातील गौतमी पाटील, असं ब्रीदवाक्य तिच्या चाहत्यांनी बनलेलं आहे. गौतमीच्या कार्यक्रमाला तिच्या चाहत्यांची इतकी गर्दी होते की पोलीस प्रशासनावर देखील दबाव निर्माण होतो. विशेष म्हणजे गौतमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी महिला प्रेक्षकदेखील उपस्थित राहतात.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Swapnil Gaikwad (@swapnilgaikwad8823)

1 thought on “Gautami patil movie release date:महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीं मुळे गौतमी पाटील हिच्या चित्रपटाला फटका?”

Leave a Comment