“प्रिय पप्पा…”, सासरे विलासराव देशमुख यांच्या आठवणीत जिनिलीया देशमुखने शेअर केली भावुक पोस्ट

लोकप्रिय बॉलिवूड आणि दाक्षिणात्य अभिनेत्री जिनिलीया डिसूजा मराठमोळ्या रितेश देशमुखच्या प्रेमात पडली आणि महाराष्ट्राची सून झाली. जिनिलियाने आपल्या वागण्याने मराठी प्रेक्षकांची मनं जिंकली. तिच्या नुसत्या हसण्यावर चाहते फिदा आहेत. जिनिलिया आणि रितेश यांची जोडी सोशल मीडियावरही प्रचंड लोकप्रिय आहे. मात्र आज १४ ऑगस्ट रोजी रितेशचे वडील आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने जिनिलियाने शेअर केलेली एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय. जिनिलिया आणि विलासराव यांच्यात खूप चांगलं नातं होतं. ती देशमुख कुटुंबाची मुलगीच झाली. असं असताना अचानक वडिलांसारखी माया करणारे विलासराव गेले आणि आपलं मायेचं छत्र हरवल्याची भावना तिने व्यक्त केली होती.

 

महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणीत अभिनेत्री जिनिलीया देशमुखने भावुक पोस्ट लिहित सासऱ्यांसह जुना फोटो शेअर केला आहे. हा फोटो रितेश आणि जिनिलीयाच्या लग्नातील आहे. या फोटोवर अभिनेत्रीने “मिस यू पप्पा…”असे लिहिले आहे.

 

“प्रिय पप्पा…मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे, तुमचे विचार फार प्रभावी आहेत त्यामुळे आज तुमच्याशिवाय जगणे आम्हाला कठीण जात आहे. मला खात्री आहे तुम्ही जिथे कुठे असाल ती जागा खूपच खास असेल कारण, प्रत्येकजण कायम हसत राहील याची तुम्ही फार काळजी घेता. पप्पा, तुमची खूप आठवण येते…” असे जिनिलीयाने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. अभिनेत्रीच्या पोस्टवर चाहत्यांनी अनेक कमेंट करून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना अभिवादन केले आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

 

जिनिलियाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. नेटकरीही तिच्या पोस्टवर तिचं सांत्वन करत आहेत. तुझ्या पोस्टने आमच्याही डोळ्यात पाणी आलं, अशी प्रतिक्रिया एकाने दिली आहे. तर मुलींसाठी बाप हा नेहमीच खास असतो आणि अशीच भावना असते असं काही नेटकऱ्यांनी लिहिलं आहे.

हेही वाचा :

बारामतीच्या ‘शेतकऱ्याला’ थेट पंतप्रधानांचे निमंत्रण; काय आहे प्रकरण?

join Our–  WHATSAPP GROUP  ,INSTAGRAM , TWITTER   ,  FACEBOOK PAGE– for every update

1 thought on ““प्रिय पप्पा…”, सासरे विलासराव देशमुख यांच्या आठवणीत जिनिलीया देशमुखने शेअर केली भावुक पोस्ट”

Leave a Comment