Gold Prices Update : सणांआधी सोनं झालं स्वस्त, 5 महिन्यात सोन्याचा भाव 5000 रुपयांनी कमी

Gold Prices Update : गणेश चतुर्थीपासून सणासुदीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुढील महिन्यापासून लग्नसराईचा हंगाम सुरू होणार आहे. सणासुदीच्या काळात आणि लग्नसोहळ्याच्या निमित्ताने सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या तयारीत असलेल्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. (Gold Prices Update)जर तुम्ही या सणासुदीच्या काळात सोने व त्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगले दिवस आले आहेत. कारण आता तुम्हाला पूर्वीपेक्षा कमी पैसे खर्च करावे लागतील. गेल्या पाच महिन्यांत सोन्याचा भाव 5000 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 8.14 टक्क्यांनी घसरला आहे.

5 महिन्यांत किंमती 8 टक्क्यांहून अधिक कमी झाल्या (Gold Prices Update)

सराफा बाजारात सोन्याच्या दरात अवघ्या 7 सत्रात 2577 रुपयांनी घट झाली आहे. आणि 5 मे 2023 शी तुलना केली तर त्या दिवशी सोन्याचा दर 61,646 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, जो इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या आकडेवारीनुसार 4 ऑक्टोबर 2023 रोजी 56,627 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आला आहे. म्हणजेच सोन्याचा भाव उच्चांकावरून 5019 रुपये प्रति 10 ग्रॅमने कमी झाला आहे.

भाव का कमी होत आहेत? (Gold Prices Update)

अमेरिका आणि युरोपमध्ये आता महागाई कमी होऊ लागली आहे. 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर वाढलेला महागाईचा दर आता कमी होऊ लागला आहे. महागाई कमी झाल्यामुळे सोन्यातील गुंतवणूक कमी होत आहे. त्यामुळे इतर चलनांच्या तुलनेत डॉलर मजबूत होत आहे. येथून डॉलर आणखी मजबूत होईल, असा अंदाज आहे. त्यामुळेच डॉलरची मजबूती आणि सोन्याची मागणी घटल्याने सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे. जगभरातील अर्थव्यवस्था वाईट काळातून सावरायला लागल्या आहेत. गेल्या वर्षी आर्थिक संकट पाहता गुंतवणूक वाचवण्यासाठी लोक सोने खरेदी करत होते. पण आता परिस्थिती बदलत आहे.

चांदीच्या दरातही घट झाली आहे (Gold Prices Update)

सोन्याच नव्हे तर चांदीच्या दरातही मोठी घसरण पाहायला मिळत आहे.(Gold Prices Update) 5 मे 2023 रोजी चांदीचा भाव 77,280 रुपये प्रति किलो होता, जो 4 ऑक्टोबर रोजी 67091 रुपये प्रति किलोवर आला आहे. म्हणजेच 5 महिन्यांत चांदीची किंमत 10,189 रुपयांनी कमी झाली आहे. गेल्या 5 महिन्यांत चांदी 13 टक्क्यांहून अधिक स्वस्त झाली आहे.

दिवाळी धनत्रयोदशी पूर्वी सोने-चांदी झाले स्वस्त (Gold-Silver Prices Update)

सोन्या-चांदीच्या दरात घट झाल्याने दिवाळी धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. किमती कमी झाल्यामुळे सोने-चांदीचे दागिने खरेदीसाठी पूर्वीपेक्षा कमी पैसे खर्च करावे लागतील, त्यामुळे मागणी वाढल्याचा फायदा व्यापाऱ्यांना होण्याची शक्यता आहे.

 

हेही वाचा 

1 October New Rule : केवळ सिलिंडरच्या किमतीच वाढल्या नाहीत तर आजपासून हे 5 नियमही बदलले

1 thought on “Gold Prices Update : सणांआधी सोनं झालं स्वस्त, 5 महिन्यात सोन्याचा भाव 5000 रुपयांनी कमी”

Leave a Comment