Gold Silver Rate Today: सोन्याच्या भाव मध्ये वाढ ,जागतिक घडामोडींचा होणार मोठा परिणाम

Gold Silver Rate Today : सोने लवकरच भरारी घेण्याच्या तयारीत आहे. तर चांदीला पण लकाकी येणार आहे.सोन्याच्या ग्राहकांसाठी अच्छे दिन येण्याची दाट शक्यता आहे .जागतिक पातळीवर नवनवीन घडामोडी होत आहेत.अमेरिकेत महागाई रेकॉर्ड ब्रेक वाढत आहे .फेडरल रिझर्व्ह आणि अमेरिकन केंद्रीय बँक पर्वी पेक्षा अधिक व्याजदर आकारण्याची भीती आहे. तर भारतीय केंद्र सरकारने सोन्याच्या कोणतेही कलाकुसर नसलेल्या दागिन्यांच्या आयातीवर बंदी घातली आहे.केंद्राने काही ठरवून दिलेले नियम यांचे उल्लंघन होत नाही .म्हणून केंद्र सरकारने हे पाऊल टाकले आहे .तसेच दागिन्यांच्या किमतीत पण वाढ दिसेल .तर आता सोने -चांदी गगन भरारी घेण्याची शक्यता आहे .सोने-चांदीत (Gold Silver Rate Today )इतकी वाढ झाली आहे.

जुलै महिन्यात हजार रुपयांची भरारी  खऱ्या अर्थाने सोने आगेकूच करत आहे.गेल्या मागील दोन महिन्यात, मे आणि जून मध्ये किमतीत मोठी तफावत दिसली नाही भाव  चढ-उत्तर चालू होता ,पण भाव घसरवणीवरच होते.जुलै महिन्यात सोन्याने मोठा पल्ला गाठला . एक हजार रुपयांची दरवाढ झाली आहे . तर चांदी 1300 रुपयांनी वधारली. यामुळे गुंतवणूकदारांना उकळ्या फुटल्या आहेत. त्यांना अधिक फायदा मिळेल.

 

या महिन्यात भरारी 13 जुलै रोजीचे दर अपडेट झालेले नाही. 12 जुलै रोजी सोन्यात 210 रुपयांची वृद्धी झाली. 8 जुलै रोजी सोने थेट 400 रुपयांनी वधारले. 4 जुलै आणि 6 जुलै रोजी सोन्यात प्रत्येकी 100 रुपयांची दरवाढ झाली होती.(Gold Silver Rate Today ) 1 जुलै रोजी सोन्यात 220 रुपयांची उसळी घेतली होती. गुडरिटर्न्सनुसार, या महिन्यात 3, 7, आणि 10 जुलै रोजी सोन्यात प्रत्येकी 100 रुपयांची घसरण दिसून आली. काल 12 जुलै रोजी, 22 कॅरेट सोने 54,800 रुपये तर 24 कॅरेट सोने 59770 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले.

 

>>14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव 

  • 12 जुलै, 24 कॅरेट सोने 58,786 रुपये
  • 23 कॅरेट 58,551 रुपये
  • 22 कॅरेट सोने 53,848 रुपये
  • 18 कॅरेट 44,090 रुपये
  • 14 कॅरेट सोने 34,390 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले
  • इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे
  • वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते
  • तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते

 

 मिस्ड कॉलवर किंमती

18 कॅरेट आणि 22 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी (Gold Silver Rate Today )त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल वर कळू शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. आणि त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

 

APP BIS Care

सोनार तुम्हाला फहासवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास, तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये मध्ये  जाऊन तुम्ही हे बीआयएस(Bureau of Indian Standards ) ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर जाईना आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.

1 thought on “Gold Silver Rate Today: सोन्याच्या भाव मध्ये वाढ ,जागतिक घडामोडींचा होणार मोठा परिणाम”

Leave a Comment