उच्च शिक्षणासाठी शासनाची ‘स्वाधार’ योजना, जाणून घ्या लाभ

स्वाधार’ योजना: हि   योजना ११वी, १२वी तसेच १२वी नंतरचे व्यावसायिक किंवा बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध नसल्याने या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना मोट्या शहरातील  महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागतो. वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळूनही शिक्षणापासून वंचित राहावे लागते. अशा विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे स्वप्न भंग होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेंतर्गत मदत दिली जाते.

 

शहरातील विद्यार्थ्यांना ६० हजार !

◊ मुंबई शहर, मुंबई उपनगर येथे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ३२ हजार रुपये भोजन भत्ता, २० हजार रुपये निवास भत्ता आणि ८ हजार रुपये निर्वाह भत्ता असे एकूण ६० हजार रुपये दरवर्षी दिले जातात.

◊विभागीय शहरातील व उर्वरित क वर्ग पालिका क्षेत्रातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना २८ हजार रुपये भोजन भत्ता, १५ हजार रुपये निवास भत्ता आणि ८ हजार रुपये निर्वाह भत्ता असे एकूण ५१ हजार रुपये दरवर्षी दिले जातात.

◊उर्वरित ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना २५ हजार रुपये भोजन भत्ता, १२ हजार रुपये निवास भत्ता, ६ हजार रुपये निर्वाह भत्ता असे एकूण ४३ हजार रुपये दिले जातात.

◊ वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांना दरवर्षी ५ हजार रुपये आणि इतर शाखेतील विद्यार्थ्यांना २ हजार रुपये दिले जातात.

‘स्वाधार’ योजनेसाठी पात्रता

अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जातो. यासाठी जात प्रमाणपत्र बंधनकारक असून, वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसावा. किमान ५० टक्क्यांपेक्षा जास्त गुण, दिव्यांगांसाठी ३ टक्के आरक्षण, पालकांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे.

 

‘स्वाधार’ योजना अर्ज कोठे कराल ?

या शैक्षणिक वर्षासाठी संबंधित विद्यार्थ्यांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई यांच्याकडे ऑनलाइन पोर्टलद्वारे अर्ज सादर करावेत.

‘स्वाधार’ योजना कशी असते मदत?

भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम राज्य शासनाच्या ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने‘तून विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा करण्यात येते.

1 thought on “उच्च शिक्षणासाठी शासनाची ‘स्वाधार’ योजना, जाणून घ्या लाभ”

Leave a Comment