तुम्ही फॉर्म भरलाय ना?: तलाठी भरतीचं वेळापत्रक आलं,याच महिन्यात परीक्षाला सुरवात..

महाराष्ट्र राज्यामध्ये तलाठी भरतीचं वेळापत्रक आता जाहीर झालं आहे. या भरती मध्ये 4644 पदांसाठी हि भरती लागली आहे. या भरतीसाठी साडे अकरा लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. या भरतीचा मुद्दा विशेष म्हणजे आत्ताच्या पावसाळी अधिवेशनातही चांगलाच चर्चेत होता. भरतीच्या फी वरून आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारला सवाल केला आहे.त्यावर उत्तर म्हणून विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितले. पण मात्र. अजूनही हि प्रश्न आजही कायम आहे. आता तलाठी भरतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

 

भूमी अभिलेख विभागाच्यावतीने तलाठी (गट-क) च्या ४६४४ पदांसाठी घेण्यात येणारी परीक्षा एका महिन्यात पूर्ण होणार आहे. हि परीक्षा 17ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या कालावधीत म्हणजेच जवळपास एक महिन्यात सर्व टप्यातील परीक्षा पूर्ण होणार आहे. ही भरतीप्रक्रिया टीसीएस कंपनीच्यामार्फत राबविण्यात आली आहे. सध्या परीक्षा घेण्याची तयारी पूर्ण झाली असून पात्र असणाऱ्या उमेदवारांना परीक्षाच्या किमान  दहा दिवस आधी परीक्षा केंद्रचे  नाव येईल.

 

तलाठी भरती मध्ये ११ लाख १० हजार ५३ उमेदवार परीक्षेला बसणार आहेत .या उमेदवारांना अडचण येणार नाही म्हणून राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्र असणार आहे. हि परीक्षा तीन सत्रांत ही परीक्षा होणार आहे. सकाळी 9 ते 11 , दुपारी 12 .30 ते 2.30 आणि सायंकाळी 4.30 ते 6.30 अशी वेळ निश्चित करण्यात आलेली  आहे. उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेचे गाव अगोदर समजणार असून परीक्षा केंद्र केवळ तीन दिवस अगोदर प्रवेशिकेबरोबरच दिसणार आहे.दरम्यान,तलाठी भरती ऑनलाईन असून 200 गुणांची परीक्षा संगणकावर घेण्यात येणार आहे.गुणवत्ता यादी मध्ये समावेश करण्यासाठी एकूण गुणांच्या 45 टक्के मार्क्स मिळणे अनिवार्य आहे.

 

तलाठी भरतीचं वेळापत्रक:

परीक्षेची तारीख अन् टप्पे

पहिला टप्पा – 17 , 18 , 19 , 20, 21, 22 ऑगस्ट

दुसरा टप्पा – 26 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर

तिसरा टप्पा 1, 4 सप्टेंबर ते 14  सप्टेंबर

23, 24, 25 ऑगस्ट तसेच 2, 3, 7, 9, 11, 12 आणि 13 सप्टेंबर या तारखांना परीक्षा होणार नाहीत.

 

 

join Our–  WHATSAPP GROUP  ,INSTAGRAM , TWITTER   ,  FACEBOOK PAGE– for every update 

 

Leave a Comment