Income Tax Return : ITR फाईल करताना अडचण असल्यास? या Helpline क्रमांकावर करा कॉल

Income Tax Return :आर्थिक वर्ष 2022-23 साठी इनकम टॅक्स रिटर्न दाखल (Income Tax Return) करण्याची अंतिम तारीख आता एकदम जवळ आली आहे. केवळ दोन दिवस आयटीआर भरण्यासाठी उरले आहेत. आयकर विभागाच्या माहितीनुसार, आतापर्यंत 5.3 कोटींहून अधिक करदात्यांनी इनकम टॅक्स रिटर्न दाखल केला आहे. येत्या दोन दिवसांत त्यांना आयटीआर दाखल करण्याची घाई करावी लागेल. 31 जुलै ही अंतिम मुदत (ITR Filing Deadline) आहे. वेळेच्या आत आयटीआर दाखल केला नाही तर दंड बसू शकतो. करदात्यांच्या मदतीसाठी आयकर खात्याने हेल्पलाईन क्रमांक, ईमेल्स जाहीर केले आहे.

 

Income Tax Return |ऑनलाईन कसे करावे ITR फाईल

आयकर खात्याने करदात्यांना ऑनलाईन इनकम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी, ई-फाईलिंगसाठी एक स्वतंत्र पोर्टल तयार केले आहे. त्यासाठी https://www.incometax.gov.in/iec/foportal/ यावर लॉग इन करावे लागेल. नंतर तुम्ही  ऑनलाइन आईटीआर फाईल करु शकता.

Income Tax Return | ही करू नका चूक 

ITR फायलिंग वेळी करदाते अनेकवेळा छोट्या-मोठ्या चुका करतात. त्यामुळे अनेकदा रिफंड मिळण्यास उशीर होतो. पहिल्यांदा इनकम टॅक्स रिटर्न फाईल करणार असाल तर तुम्ही या चुका करु नका. ई-फायलिंग पोर्टलवर ITR भरताना चुका टाळणे आवश्यक आहे. योग्य माहिती आणि तपशील देणे आवश्यक आहे.

 

Income Tax Return | अडचणीसाठी हेल्पलाईन 

आयकर विभागाने ट्विट आणि ई-मेलच्या माध्यमातून करदात्यांसाठी हेल्पलाईन क्रमांकाची माहिती दिली. करदात्यांना समस्या अडचण असेल तर ते या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार करु शकतात. आयकर विभाग 24 तासांत हेल्पलाईन क्रमांक, चॅटबॉट अथवा ईमेल्सच्या सहायाने या अडचणी सोडवणार आहे.

 

24×7 तास सुविधा:

आयकर विभागाने याविषयीचे अधिकृत ट्विट केले आहे. त्यानुसार, आयटीआर दाखल करण्यासाठी, कराचा भरणा करण्यासाठी, इतर सेवांसाठी करदात्यांना मदत करण्यात येत आहे. त्यासाठी हेल्पडेस्क सुरु करण्यात आला आहे. 24×7 आधारे करदात्यांना मदत करण्यात येईल. कॉल, लाईव्ह चॅट, वेबेक्स सत्र आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत करण्यात येईल. शनिवार-रविवारी सुद्धा अंतिम मुदतीपर्यंत ही सुविधा सुरु राहणार आहे.  आयकर विभागाने करदात्यांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर केले आहेत.

 

करदात्यांच्या मदतीसाठी Helpline क्रमांक

1800 103 0025 1800 419 0025 +91-80-46122000 +91-80-61464700

या ई-मेलवर करा तक्रार

करदात्यांना पॅन आणि मोबाईल क्रमांकाच्या आधारे orm@cpc.incometax.gov.in वर तक्रार दाखल करता येईल.

याठिकाणी करा संपर्क

एआयएस, टीआयएस, एसएफटीसाठी अडचण असल्यास, ई-अभियान वा ई-पडताळणी विषयीची अडचण, समस्येसाठी 1800 103 4215 या क्रमांकावर कॉल करता येईल.