Suicidal Thoughts : एखाद्याच्या मनात आत्माहत्येचे विचार आहेत हे कसे ओळखाल? जाणून घ्या ही काही लक्षणे आणि त्यावरील उपाय

Suicidal Thoughts : जगभरात आज-काल आत्महत्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे .प्रत्येक माणूस आज कोणत्या ना कोणत्या कारणाने हतबल झालेला आहे. अशावेळी माणूस डिप्रेशन मध्ये जातो, तसेच अनेकदा अशावेळी आत्महत्या करण्याचा विचारही त्याच्या मनात येतो. हि काही लोक काहीतरी चुकीचे पाऊल उचलतात. जगभरात दरवर्षी 8 लाखापेक्षा जास्त लोक आत्महत्या करतात तर त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक लोक आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात . आत्महत्या करण्याचा विचार येणे ,म्हणजे हे खरेतर शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक आजाराचे लक्षण आहे. एखाद्या व्यक्तीच्या सतत मनात जर सारखेच आत्महत्येचे विचार येत असतील .तर त्याला Suicidal  ideations (आत्मघातकी कल्पना) म्हणले जाते. आत्महत्येचे विचार वारंवार येण्याचे कारण काय आहेत आणि यावरील उपाय काय जाणून घेऊयात.

 

आत्महत्याचे विचार एखाद्याच्या मनात येत असल्याचे लक्षण कोणती आहेत?

  • आपण कोणत्या पद्धतीने आत्महत्या करू शकतो. सतत मृत्यूचा विचार करणे ,याचा विचार करत राहणं.
  • कुटुंब मित्र-मैत्रिणी यांच्यापासून सतत वेगळं राहणं.
  • अचानक राहणीमानात बदल होणे.
  • लिहिणे , मरण्याविषयी बोलणे तसेच सारखा तोच विचार करणे.
  • इतरांपासून कायम अस्वस्थ वाटत राहणे
  • वारंवार चिडचिड करणे
  • त्याच्या चुकीच्या वागण्यामुळे दारू आणि ट्रकचे प्रमाण वाढणे
  • भविष्याबद्दल निगेटिव्ह कल्पना करणे
  • सर्वांमध्ये असूनही आपण त्यांच्यामध्ये नाही असे वाटणे
  • ज्या गोष्टीत आनंद वाटत होता, आता त्या गोष्टीत रस नसणे.

 

हे उपाय करा

  • नात्यामध्ये सुसंवाद असावा एकमेकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा
  • व्यायाम योग सकस जेवण
  • ज्यांच्याजवळ मनातील भावना व्यक्त करता येतील असे तीन-चार मित्र मैत्रिणी असे असावेत.
  • स्वतःला वेळ द्या ,स्वतःशी बोला
  • आपण नक्की काय करतो ,कसे वागतो, का वागतो, आपली ध्येय स्वप्ने, आपली संगत याचा विचार करा.
  • आपल्या आवडत्या व्यक्तीची भेट घ्या.

आपल्या आत्महत्येच्या विचारातून बाहेर येण्यासाठी समुपदेशन हेल्पलाइनची मदत, सकारात्मक विचार आणि वैद्यकीय मदत हे मार्ग आहेत. तर गंभीर प्रकार असल्यास इलेक्ट्रोकन्वल्सिव्ह (ECT)  थेरेपी अत्यंत उपयुक्त आहे. थेरेपी आणि औषधोपचार मदतीने आत्महत्येच्या विचारातून बाहेर जाऊ शकतात व तसेच यासाठी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणे गरजेचे आहे.

 

1 thought on “Suicidal Thoughts : एखाद्याच्या मनात आत्माहत्येचे विचार आहेत हे कसे ओळखाल? जाणून घ्या ही काही लक्षणे आणि त्यावरील उपाय”

Leave a Comment