वारंवार उचकी! थांबायचं नाव घेत नाही? ‘हे’ उपाय करून बघा…

आपल्यापैकी सर्वांना कधी ना कधी उचकी लागली असेल, क्वचितच कोणाला तरी नसेल लागली . उचकी लागणे हे अगदी सामान्य आहे. आणि ही फार काळ टिकत नाही, काही वेळेस उचकी आली की परत जाण्याचे नाव घेत नाही . हे सहसा मसालेदार पदार्थ व कमी पाणी पिल्याने अशी समस्या उद्भवते. यावर आपण सोपे उपाय करू शकतो.

 

उचकीपासून सुटका करण्यासाठी हे करू शकतात 

पाणी प्या

उचकी लागल्यावर पाणी पिणे ही सर्वात जुनी रेसिपी आहे. आपल्याला जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती जाणवते.त्यावेळी एक ग्लास पाणी हळूहळू प्या, ते घशात चमत्कारिकरित्या काम करते, ज्यामुळे तुमची समस्या दूर होते.

जीभ बाहेर काढणे

जीभ बाहेर काढायला संकोच वाटू शकतो, पण ही युक्ती खरोखरच परिणामकारक आहे. यासाठी आपण हळूहळू आपली जीभ बाहेरच्या दिशेने बाहेर काढली पाहिजे. असे केल्याने उचकी थांबेल.

श्वासोच्छवास थांबवा

जर तुम्हाला वारंवार उचकीचा त्रास होत असेल तर ते टाळण्यासाठी श्वासोच्छवासाच्या टेकनिकचा अवलंब करा. हातांच्या मदतीने नाक आणि तोंड काही सेकंद बंद करा जेणेकरून उचकी घशापर्यंत पोहोचण्यास त्रास होईल. मात्र ज्यांना श्वास घेण्यास त्रास होत असेल त्यांनी इतर उपाय करावेत.

बर्फाचे पाणी

बर्फाच्या पाण्याने उचकी थांबू शकते. यासाठी ग्लासभर पाण्यात आईस क्यूब टाकून अर्धा मिनिट गुळण्या करा. जर उचकी एकाच वेळी थांबली नाही तर ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा करा.

 

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही या वृत्ताला दुजोरा देत नाही.)

हेही वाचा 
join Our–  WHATSAPP GROUP  ,INSTAGRAM , TWITTER   ,  FACEBOOK PAGE– for every update 

1 thought on “वारंवार उचकी! थांबायचं नाव घेत नाही? ‘हे’ उपाय करून बघा…”

Leave a Comment