डेबिट कार्डशिवाय UPI Pin सेट करा,आणि ऑनलाइन पेमेंट 2 मिनिटांत करा

आता तुम्ही डेबिट कार्डशिवायही युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ची सेवा घेऊ शकता. UPI Pin जनरेट करण्‍यासाठी डेबिट कार्डची आवश्‍यकता नाही, पिन फक्त आधार कार्डवरूनच जनरेट केला जाईल. होय, UPI पिनसाठी आधार कार्ड तुम्हाला मदत करेल. पूर्वी, UPI सक्रिय करण्यासाठी, डेबिट कार्ड असणे आवश्यक होते, परंतु आता तुम्ही आधारद्वारे तुमच्या फोनवर UPI सेवा सुरू करू शकता.

देशात असे अनेक लोक आहेत ज्यांचे बँक खाते आहे पण त्यांच्याकडे डेबिट कार्ड नाही. हे लोक UPI सेवा वापरण्यास सक्षम नव्हते. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या वेबसाइटनुसार, आधारचा OTP टाकून UPI Pin सहज सेट करता येतो. यामुळे ज्यांच्याकडे डेबिट कार्ड नाही ते देखील UPI वापरू शकतील.

तुमच्याकडे डेबिट कार्ड नसेल तर काळजी करू नका. येथे आम्ही डेबिट कार्डशिवाय UPI PIN कसा सेट करायचा ते सांगत आहोत. हे तुमच्यासाठी खूप सोपे करेल आणि तुम्ही क्षणार्धात पेमेंट करू शकाल. UPI पिन तयार करण्यासाठी ही प्रक्रिया फॉलो करा.

आधारच्या मदतीने UPI Pin सेवा कशी सुरू करावी?
  1. UPI अॅपवर जा आणि नवीन UPI ​​पिन सेट करण्याचा पर्याय निवडा.
  2. आधार आधारित पडताळणीचा पर्याय निवडा.
  3. नंतर पुढे परवानगी(संमती ) द्या.
  4. नंतर तुमच्या आधारचे शेवटचे 6 अंक टाका.
  5. नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर आलेला ओटीपी (OTP) टाका.
  6. परवानगी देऊन पुढे जा
  7. बँक कन्फर्म झाल्यानंतर तुम्ही नवीन यूपीआय पिन सेट करू शकता.

 

संमती आवश्यक

NPCI च्या वेबसाइटनुसार, आधार बद्दल माहिती काढण्यासाठी आणि प्रमाणित करण्यासाठी ग्राहकाची परवानगी (संमती) आवश्यक आहे. प्रत्येक वेळी तुम्ही UPI PIN जनरेट करता तेव्हा परवानगी द्यावी लागेल. जेव्हा त्याचा आधार आणि तोच मोबाईल क्रमांक बँकेत नोंदणीकृत असेल तेव्हाच ग्राहक आधारसह उपि पिन सेट करू शकता.

चुकीच्या UPI आयडीवर पाठवलेले पैसे कसे परत मिळवायचे घ्या, जाणून सविस्तर

 

Latest Update join Our–  WHATSAPP GROUP  ,INSTAGRAM , TWITTER   ,  FACEBOOK PAGE– for every update

Leave a Comment