तुला Kiss करु का? Huma Qureshi ला ‘मास्टर शेफ’च्या परदेशी जजनं विचारलं अन्…; पाहा Video

Huma Qureshi : हुमा कुरेशीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला पाहता अनेकांनी मास्टर शेफ ऑस्ट्रेलियाचा माजी परिक्षकाचे कौतुक केले आहे. तर हुमा लवकरच ‘तरला’ या चित्रपटात दिसणार आहे.

 

Huma Qureshi : बॉलिवूड अभिनेता हुमा कुरेशी ही गेल्या काही दिवसांपासून तिचा आगामी चित्रपट ‘तरला’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ही एक बायोपिक असून त्यात हुमा तरला दलाल यांच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे . तेव्हापासून सोशल मीडियावर तिचे चाहते तिची स्तुती करत आहेत. दरम्यान, हुमा कुरेशी ही एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. या व्हिडीओत हुमा ही मास्टर शेफ ऑस्ट्रेलियाचा माजी परिक्षक आणि सुत्रसंचालक गॅरी मेहिगनसोबत दिसली.

हुमा आणि शेफ गॅरीचा हा व्हिडीओ विरल भयानी या सेलिब्रिटी फोटोग्राफरनं शेअर केला आहे. हा व्हिडीओ हुमाच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी काढण्यात आलेला आहे. याच कार्यक्रमात शेफ गॅरी मेहिगन देखील पोहोचला होता. त्यावेळी त्यानं चाहत्यांना नकळत मेसेज देखील दिला. शेफ गॅरी हुमाला किस करण्याआधी तिची विचारणा करतो की मी किस केलं तर चालेल का? व्हिडीओत शेफ गॅरी हुमाला भेटतो आणि विचारतो की आपण किस करणार आहोत? हुमा शेफ गॅरीला विनम्रतेनं उत्तर देत हो म्हणाली. त्यानंतर शेफ गॅरीनं हुमाला गालावर हॅलो किस केलं. शेफ गॅरीनं केलेल्या या कृत्याची सगळ्यांनी स्तुती केली आहे.

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


 

 

हुमाच्या या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, “ती बऱ्याच वर्षांपूर्वी म्हणाली होती की आधी परवानगी घ्यायला हवी.” दुसरा नेटकरी म्हणाला, “हुमाला अनकमफर्टेबल वाटत आहेत.” तिसरा नेटकरी म्हणाला, “त्या ज्या प्रकारे तिची परवाणगी घेतली हे मला फार आवडलं.” आणखी एक नेटकरी म्हणाला, “हुमा ही कधीच कोणाला नाही बोलत नाही. ती खूप चांगली आहे.”

 

 

 

हुमाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर हुमा ही ‘तरला’ या चित्रपटात तरला दलाल यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तरला दलाल या एक लोकप्रिय भारतीय कुकबूक लेखिका आणि शेफ होत्या. त्यांनी त्यांच्या पुस्तकाच्या, टीव्ही शो आणि जेवण बनवण्याच्या क्लासेसच्या मदतीनं व्हेज जेवणाला लोकप्रिय बनवलं. खरंतर व्हेज जेवणाला लोकप्रिय करण्यात त्यांची मोठी भूमिका आहे. जेवणासोबतच त्यांच्या अनुभवनानं त्यांना एक हाऊसहोल्ड नाव म्हणजे प्रत्येक घरात ओळखली जाणारी व्यक्ती बनवली. हुमा पहिल्यांदा कोणत्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. या आधी हुमा डबल एक्सेल या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात हुमासोबत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा दिसली होती.

Leave a Comment