Crime News:असं काय घडलं की क्रूरतेच्या सीमा ओलांडल्या ! आधी महिलेचे डोळे बाहेर काढले, मग जीभ आणि प्रायव्हेट पार्ट कापला

Crime News  : बिहारमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी चिंताजनक  घटना घडली आहे. जमिनीच्या वादातून एका महिलेसोबत क्रूर कृत्य करत तिची हत्या करण्यात आली आहे. चौघांनी 45 वर्षीय सुलेखा देवीला जबर मारहाण केली. मग चाकूने तिचे डोळे काढले. त्यानंतर जीभ आणि प्रायव्हेट पार्टही कापला. यामुळे महिलेचा जागीच मृत्यू झाला. पसराया पोलीस ठाण्याअंतर्गत बहियार गावात ही घटना घडली. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. अन्य तीन आरोपी फरार आहेत. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे 9 वर्षांपूर्वी या आरोपींनी महिलेचा पती आणि दिराची हत्या केली होती. एक आरोपी नुकताच जामिनावर बाहेर आला होता.

 

असं काय घडलं?

पीडित महिलेचा शेजाऱ्यांसोबत 5 एकर जमिनीवरुन वाद सुरु होता. याच वादातून आरोपींनी हे क्रूर हत्याकांड घडवले. पीडित महिला शेतात कामावर गेली असताना आरोपी तेथे गेले. त्यांनी महिलेला बेदम मारहाण केली. मग चाकूने तिचे डोळे बाहेर काढले. मग तिची जीभ आणि प्रायव्हेट पार्ट कापला. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. 25 एप्रिल 2014 मध्ये महिलेचा पती बबलू सिंह आणि लहान दिराचीही आरोपींनी हत्या केली होती.

 

नातेवाईकांकडून चक्का जाम

Crime News :या हत्याकांडामुळे परिसरात खळबळ माजली आहे. महिलेच्या हत्येमुळे संतप्त नातेवाईकांनी राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम केला. अनेक तास महामार्गावर चक्का जाम झाल्यामुळे वाहतूक खोळंबली होती. गोगरीचे एसडीपीओ मनोज कुमार यांनी घटनास्थळी धाव घेत नातेवाईकांची समजूत काढली. आरोपींना लवकर अटक करण्यात येईल, असे आश्वासनही दिले. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. तसेच घटनास्थळावरुन गुन्ह्यात वापरलेला चाकूही हस्तगत केला आहे.

Leave a Comment