Income Tax Return Verification : आयटी विभागाचा करदात्यांना इशारा, हे महत्त्वाचे काम त्वरित करा नाहीतर आयटीआर अवैध ठरेल

Income Tax Return Verification : आयकर विभागाने आपल्या करोडो करदात्यांना अलर्ट जारी केला आहे. आयटी विभागाने म्हटले आहे की, जर करदात्यांनी आर्थिक वर्ष 2022-23 आणि मूल्यांकन वर्ष 2023-24 साठी आयटीआर दाखल केल्यानंतर ई-व्हेरिफिकेशन(Income Tax Return Verification) प्रक्रिया पूर्ण केली. नाही तर, तुमचे रिटर्न अवैध असेल. अशा परिस्थितीत हे काम लवकरात लवकर पूर्ण करा. अन्यथा दंड भरावा लागू शकतो.

आयकर विभागाचा सतर्क राहण्याचा इशारा

आयकर विभागाने आपल्या अधिकृत X म्हणजेच ट्विटर हँडलवर म्हटले आहे की, प्रिय करदात्यांनो, तुमची ई-फायलिंगची प्रक्रिया आजच पूर्ण करा! खाली दिलेल्या पद्धतींनी ई-पडताळणी पूर्ण करा. ITR दाखल केल्यानंतर, 30 दिवसांच्या आत सत्यापन प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. तुम्ही असे न केल्यास, तुम्हाला नंतर दंड भरावा लागू शकतो.

Income Tax Return : ITR फाईल करताना अडचण असल्यास? या Helpline क्रमांकावर करा कॉल

ई-व्हेरिफिकेशन पूर्ण करणे का आवश्यक आहे?(Income Tax Return Verification)

आयकर विभागाच्या नियमांनुसार, आयकर विवरणपत्र भरल्यानंतर ई-व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. हे काम आयटीआर भरल्यानंतर ३० दिवसांच्या आत करणे आवश्यक आहे. जर तुम्ही जुलैच्या शेवटच्या आठवड्यात आयटी रिटर्न भरले असेल, तर त्याच्या ई-व्हेरिफिकेशनची अंतिम मुदत जवळ आली आहे. जर तुम्ही हे काम पूर्ण केले नाही तर ते रिटर्न अवैध मानले जाईल.

ई-व्हेरिफिकेशन कसे पूर्ण करावे?(Income Tax Return Verification)
  • लक्षात ठेवा की आयकर रिटर्न भरताना त्याच वेळी ई-व्हेरिफिकेशन पूर्ण करणे सर्वोत्तम मानले जाते.
  • ई-व्हेरिफिकेशनसाठी, आयटी विभागाने बँक खाते, नेट बँकिंग, बँक एटीएम, आधार किंवा डीमॅट खाते अशा पाच प्लॅटफॉर्मचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
  • ई-व्हेरिफिकेशन पूर्ण करण्यासाठी, प्रथम आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलला भेट द्या.
  • यानंतर तुमचा पॅन नंबर आणि पासवर्ड टाका.
  • तुम्ही लॉग इन करताच तुम्हाला ई-व्हेरिफिकेशनचा पर्याय दिसेल.
  • तुमचे नेट बँकिंग, बँक एटीएम, आधार, डिमॅट खाते किंवा बँक खाते यामधून एक निवडा.
  • आधार पर्याय निवडल्यास, त्याच्याशी लिंक असलेल्या नंबर वर ओटीपी येईल तो टाका.
  • यानंतर ई-व्हेरिफिकेशनची प्रक्रिया सहज पूर्ण होईल.

1 thought on “Income Tax Return Verification : आयटी विभागाचा करदात्यांना इशारा, हे महत्त्वाचे काम त्वरित करा नाहीतर आयटीआर अवैध ठरेल”

Leave a Comment