Independence Day 2023 By PM Modi ची कमिटमेंट! देशवासियांना सांगितले मी लढणार, तुम्हालाही लढायचेय; लाल किल्ल्यावरून फुंकले रणशिंग

Independence Day 2023 By PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी पुढील वर्षीही मीच देशाची प्रगती सांगणार असे सुतोवाच केले. याचबरोबर मोदींनी जनतेला मोदींच्या तीन कमिटमेंटची माहिती दिली.

मी भ्रष्टाचाराविरोधात लढत राहणार, दुसरी गोष्ट म्हणजे परिवारवादाने देशाला ओरबाड़लेय. जखडून ठेवले आहे. याने देशाच्या लोकांचा हक्क हिरावला आहे. तिसरी गोष्ट म्हणजे, तुष्टीकरणाने देशाच्या मुलभूत चिंतनाला, चरित्राला डाग लावला आहे. तीन वाईट गोष्टींविरोधात लढायचे आहे. ही मोदींची कमिटमेंट आहे, असे मोदी यांनी सांगितले.

आपल्याला तीन वाईट गोष्टींविरोधात लढायचे आहे. हे आव्हान आपल्या देशाचे, जनतेचे शोषण करत आहेत. गरीब परंतू कौशल्य असलेल्या लोकांची संधी हिरावून घेत आहेत, असे मोदी म्हणाले. देशात १० कोटी लोकांचा जन्मच झाला नव्हता, त्यांच्या पत्नी विधवा होत होत्या. मुले होत होती. हे लोक देशाचा खजिना लुटत होते. ते मी बंद केले. यामुळे मोदी या लोकांना नको झालाय, अशी टीका मोदी यांनी केली.

सीमेवर दिसणारा गाव हा अखेरचा नाही तर देशाचा पहिला गाव आहे. गावांतील दोन कोटी महिलांना लखपती बनविणार. शेती, उद्योजकतेचे ट्रेनिंग दिले जाईल. ७०० जिल्ह्यांमध्ये 5G पोहोचले आहे. आता 6G ची तयारी सुरु केली आहे. हा भारत थांबत नाही, हा भारत खचून जात नाही, हा भारत दमत नाही आणि हा भारत हार मानत नाही, असा विश्वास मोदी यांनी यांनी व्यक्त केला.

 

हेही वाचा 

स्वातंत्र्य दिन चिरायू होवो… प्रियजनांना पाठवा खास सुंदर कोट्स..

बारामतीच्या ‘शेतकऱ्याला’ थेट पंतप्रधानांचे निमंत्रण; काय आहे प्रकरण?

चंद्रपूरच्या महिला सरपंचाचा देशामध्ये डंका; ‘या’ कामगिरीमुळे पंतप्रधानांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी होणार सत्कार

 

join Our–  WHATSAPP GROUP  ,INSTAGRAM , TWITTER   ,  FACEBOOK PAGE– for every update

Leave a Comment