Independence Day 2023 Quotes: स्वातंत्र्य दिन चिरायू होवो… प्रियजनांना पाठवा खास सुंदर कोट्स..

Independence Day 2023 Quotes : भारत माता की जय… जय जवान, जय किसान…. स्वातंत्र्य दिन चिरायू होवो… यंदा आपण भारत देशाच्या स्वातंत्र्य दिनाचा 77 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. या निमित्ताने देशभर अमृत महोत्सव आनंदाने साजरा केला जात आहे. देशभरातील नागरिकांमध्ये मोठा उत्साह आहे. या दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावून देशाला संबोधित करतील. भारतीय बांधव एकमेकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, कोट्स, ग्रिटिंग्ज व्हॉट्सअँप  तसेच फेसबुकवर देत आहेत. आपण देखील आपल्या मित्रमंडळी, नातेवाईक आणि आप्तजनांना स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा देऊ शकतात.

 

उत्सव तीन रंगांचा,

आभाळी आज सजला,

नतमस्तक मी त्या सर्वांसाठी,

ज्यांनी भारत देश घडविला…
भारत देशाला मानाचा मुजरा!
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

स्वातंत्र्यवीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

ज्यांनी लिहिली स्वातंत्र्याची गाथा

त्यांच्या चरणी ठेवितो माथा!
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

देश आपला सोडो न कोणी..
नातं आपलं तोडो न कोणी…
हृदय आपलं एक आहे,
देश आपली जान आहे…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


स्वातंत्र्यप्रेमींनी आपल्याला एक गोष्ट शिकवली,
कुणापुढे झुकू नका, संघर्ष पाहून थांबू नका.
15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


निशाण फडकत राहील
निशाण झळकत राहील
देशभक्तीचे गीत आमुचे
दुनियेत नि‍नादत राहील
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!


सारे जहाँ से अच्छा हिंदोस्तां हमारा,

हम बुलबुलें हैं इसकी, यह गुलिस्ताँ हमारा,
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!


देशाचे स्वातंत्र्य मानाने मिरवू,
प्रत्येक घरावर तिरंगा फडकवू,
भारत मातेचे गीत गाऊ,
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


वाऱ्यामुळे नाही
भारतीय सैनिकांच्या श्वासामुळे
फडकतोय आपला तिरंगा…!
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


“शूर आम्ही सरदार
आम्हाला काय कुणाची भीती?
देव, देश अन्‌ धर्मापायी
प्राण घेतलं हाती !”
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


“प्रत्येक गावात समाजाची
एक जुनी वेस आहे
शाळेत प्रतिज्ञेमध्ये मात्र
भारत माझा देश आहे”
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


वीरांच्या बलिदानाच्या भूमीत जन्म घेणे आपले भाग्य,
भारत माता, तुझी गाथा सर्वोच्च,
सर्वोच्च तुझा मान आणि अभिमान सर्वोच्च,
आम्ही सर्वजण तुझ्या भव्यतेपुढे नतमस्तक,
स्वातंत्र्याचा या उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
Independence Day 2023 Quotes ,Wishes In Marathi
join Our–  WHATSAPP GROUP  ,INSTAGRAM , TWITTER   ,  FACEBOOK PAGE– for every update

2 thoughts on “Independence Day 2023 Quotes: स्वातंत्र्य दिन चिरायू होवो… प्रियजनांना पाठवा खास सुंदर कोट्स..”

Leave a Comment