Independence Day : चंद्रपूरच्या महिला सरपंचाचा देशामध्ये डंका; ‘या’ कामगिरीमुळे पंतप्रधानांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी होणार सत्कार

Independence Day: प्रत्येक गावाच्या विकासासाठी एक सक्षम नेतृत्वाची गरज असते.अशातच एका महिलेने चंद्रपूर जिल्ह्याचे नाव देशात उंचावले आहे. गावामध्ये पाण्याची अडचण असल्यामुळे बाहेर वणवण फिरावे लागायचे. पण चंद्रकला मेश्राम यांनी सरकारच्या योजनेचा अभ्यास करून गावाच्या विकासाठी ठोस आणि सक्षमपणे निर्णय घेऊन गावाच्या पाण्याच्या प्रश्नाची अडचण सोडवत संपूर्ण गाव जलयुक्त केले.तसेच सरकारच्या जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरोघरी नाळ जोडणी करण्यात आले.

महिला सरपंच चंद्रकला मेश्राम(Independence Day on chandrakala meshram) यांच्या कामगिरीची दाखल थेट राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली असून, देशाच्या  स्वातंत्र्यदिनी(Independence Day) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चंद्रकला मेश्राम यांचा सत्कार करण्यात येणार आहे.महाराष्ट्र राज्यामधून विशेष म्हणजे दोन सरपंचाची निवड करण्यात आलेली आहे.त्यापैकी एक महिला सरपंच चंद्रकला मेश्राम हे एक आहेत.

 

प्रत्येक घरोघरी नळ जोडणीचे मिशन

केंद्र सरकारने जलशक्तीच्या मंत्रालयाच्यावतीने देशामध्ये हर घर जल …प्रत्येक घरोघरी नळ पोहचविण्याचे मिशन ठेवले होते. राज्यामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जल जीवन मिशन अंतर्गत झाल्याल्या कामाची माहिती घेण्यात आली. तसेच राज्य सरकारने 100 टक्के नळ जोडणीचे काम कुठे यशस्वी झाले याची संपूर्ण माहिती काढण्यात आली. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेने ब्रम्हपुरी तालुक्यातील लाखापूर गावातील सरपंच चंद्रकला मेश्राम यांचा प्रस्ताव राज्यसरकारला पाठवला.नंतर हा प्रस्ताव दिल्ली येथे पाठविण्यात आला.यामध्ये महाराष्टामधील केवळ दोन महिला सरपंचांची निवड करण्यात आली यामध्ये एक चंद्रकला मेश्राम आणि कोल्हापूर येथून एक महिला.

 

गावाचा ‘कसा’ झाला कायापालट 

 चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील लाखापूर गावामध्ये सायगाटा आणि लाखापूर मिळून गट ग्रामपंचायत आहे.लाखापूर गावाची लोकसंख्या ही 528 असून 141 कुटुंब आहेत. गावाच्या बाजूला एक छोटा नाला आणि नजदिक त्याला लागून विहीर आहे. मात्र गावकऱ्यांना पाण्यासाठी बाहेर वणवण फिरावे  लागायचे.हि अडचण समजून चंद्रकला यांनी पुढाकार घेऊन जल जीवन मिशन अंतर्गत गावात काम करायला सुरवात केली. त्यावेळेस त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण असल्यास मदत करण्यासाठी पंचायत समितीचे अभियंता मेश्राम यांनी यासाठी मोठे सहकार्य केले. यामुळेच गावाचे स्वप्न सत्यात उतरले. विहीर घेतल्यापासून पाणी मुबलक प्रमाणात यायला लागले.यामध्ये 141 घरांपैकी 103 घरी नळ जोडणी करण्यात आली.

 

पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार सत्कार

महिला सरपंच चंद्रकांत मेश्राम यांना त्यांच्या यशस्वी कामगिरीची दखल घेत त्यांना लाल किल्ला दिल्ली येथे स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्टच्या समारंभाचे साक्षीदार होण्यासाठी विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चंद्रकला मेश्राम यांचा सत्कार होणार आहे(Independence Day on chandrakala meshram). केंद्र शासनाकडून दिल्ली येथे होणाऱ्या समारंभाचे साक्षीदार होण्यासाठी महिला सरपंच चंद्रकला मेश्राम आणि त्यांचे पती यांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे. तशीच या कार्यक्रमाला चंद्रपूर उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) मिथुन सावंत यांना महाराष्ट्र राज्याकडून या कार्यक्रमाचे नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. आणि मनुष्यबळ विकास तज्ज्ञ बंडू हिरवे सोबत असणार आहेत.

 

चंद्रकला मेश्राम यांची प्रतिक्रिया :  चंद्रकला मेश्राम यांनी मीडियाशी बोलताना सांगितले कि “हा अविस्मरणीय क्षण” आहे .भारतीयांसाठी देशाचे पंतप्रधान यांच्याकडून आपला सत्कार होणे हि गर्वाची बाब आहे. अश्या त्यांच्या कामगिरीमुळे चंद्रपूर जिल्ह्याचे नाव संपूर्ण देशात गाजवले आहे.

 

हेही वाचा 

15 ऑगस्टला पंतप्रधान आणि 26 जानेवारीला राष्ट्रपतीच का करतात ध्वजारोहण?

 

join Our–  WHATSAPP GROUP  ,INSTAGRAM , TWITTER   ,  FACEBOOK PAGE– for every update 

2 thoughts on “Independence Day : चंद्रपूरच्या महिला सरपंचाचा देशामध्ये डंका; ‘या’ कामगिरीमुळे पंतप्रधानांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी होणार सत्कार”

Leave a Comment