भारताच्या ‘Chandrayaan-3’ च्या दोन दिवस अगोदर उतरणार, रशियाचं ‘लूना-25’ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर

भारताचे ‘चंद्रयान 3′(Chandrayaan-3) हे आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून 14 जुलै रोजी रॉकेट मधून उडान केले आहे. त्यानंतर भारताचे यान पाठवल्यानंतर रशियाने जवळपास एक महिन्याने 11 ऑगस्ट रोजी सोयूज 2.1 बी रॉकेटद्वारे सोयूज 2.1 बी रॉकेटद्वारे अमूर ओब्लास्टच्या वोस्तानी कॉस्मोड्रोमवरुन लॉन्च केले होते. रशियाने सोडलेले ‘लुना-25’ यान हे बुधवारी दुपारी 2.27 ला चंद्राच्या 100 शंभर किलोमीटर कक्षेत पोहोचले आहे. आता भारताचे चांद्रयान -3 चं प्रोपल्शन मॉड्यूल लँडरपासून वेगळं होणार आहे. यामुळे आजचा दिवस महत्त्वाचा आहे. चंद्रयान 3 हे 23 ऑगस्टला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर  उतरणार आहे. तर दुसरीकडे भारताच्या दोन दिवस अगोदर रशियाचे ‘लुना 25’ हे 21 ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरणारा आहे.

 

भारताचे ‘चंद्रयान 3’ नसून रशियाचे ‘लुना-25’ यान चंद्रावर आधी का पोहोचणार?

भारताच्या ‘चंद्रयान 3′ (Chandrayaan-3)कमी खर्चात आणि कमी इंधनाच्या मार्फत चंद्रावर उतरण्यासाठी भारताने पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा वापर केला आहे. यामध्ये इंधनाची बचत होते. पण या प्रक्रियेत जास्त वेळ लागतो. यामुळे ‘चंद्रयान 3’ ला जास्त वेळ लागत आहे. दुसरीकडे रशियाने लुना-25(russia-luna-25) चंद्रावर पाठवण्यासाठी अधिक थेट मार्गाचा स्वीकार केला आहे. 11 ऑगस्टला यान सोडल्यापासून 11 दिवसात ‘लुना-25’ चंद्रावर उतरणार आहे. हे यान अधिक खर्चिक शक्तीशाली रॉकेट द्वारे चंद्राच्या दिशेने निघाले होते तसेच यान हे हलक्या वजनाच्या डिझाईन मुळे आणि अधिक इंधन साठवणुकीच्या क्षमतेमुळे हे यान चंद्राच्या कक्षेत कमी वेळामध्ये पोहोचणार आहे.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर प्रथमच रशिया आणि भारताचे यान सॉफ्ट लँडिंग करणार आहे. इस्रो च्या मते, Luna-25 चे वजन फक्त 1,750 kg आहे . ते भारताच्या चंद्रयान 3(Chandrayaan-3 Update) च्या 3,800 kg पेक्षा ही जास्त हलके आहे. तसेच हलक्या वजनाच्या डिझाईन मुळे Luna-25 चंद्राच्या कक्षेत लवकर पोहोचण्यास मदत झाली आहे

 

23 ऑगस्टला किती वाजता चंद्रावर सॉफ्ट लँडिंग होणार?

चंद्रयान 3 आता चंद्रापासून च्या अत्यंत जवळच्या कक्षेत आहे. प्रॉपल्शन मॉड्युल आणि लँडर मॉड्युल परस्परापासून वेगळे होण्यासाठी तयार झाले आहेत. 23 ऑगस्टला चंद्रयान 3 (Chandrayaan-3)हे संध्याकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी सॉफ्ट लँडिंग होऊ शकतं.

 

इस्रोला चंद्रावरच्या घडामोडी ची माहिती कशी मिळणार?

आज 17 ऑगस्टला प्रॉपल्शन मॉड्युलपासूल लँडिंग मॉड्युल वेगळं होणार आहे.त्यानंतर लँडिंग मॉड्युलला चंद्राच्या आणखी जवळ नेण्यासाठी थ्रस्टर ऑन केले जातील.  त्यानंतर 20 ऑगस्टला सुद्धा असच केलं जाईल. लँडरवर ही प्रोसेस सुरु असताना प्रॉपल्शन मॉड्युलच चंद्राच्या 100*100 KM कक्षेत भ्रमण सुरु राहिलं. सॉफ्ट लँडिंगची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर रोव्हर माहिती लँडरकडे देईल. त्यानंतर ती माहिती प्रॉपल्शन मॉड्युलकवरी इस्रोला मिळेल.

 

join Our–  WHATSAPP GROUP  ,INSTAGRAM , TWITTER   ,  FACEBOOK PAGE– for every update

2 thoughts on “भारताच्या ‘Chandrayaan-3’ च्या दोन दिवस अगोदर उतरणार, रशियाचं ‘लूना-25’ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर”

Leave a Comment