Indian Squad for Asia Cup 2023 : अय्यर, सूर्यकुमार संघात; तरीही तिलक वर्माची निवड का? इलेक्ट्रिशियनच्या मुलाचा प्रवास जाणून घ्या

Indian Squad for Asia Cup 2023 : लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह यांचे भारताच्या वन डे संघात पुनरागमन तर हार्दिक पांड्याकडे उप कर्णधारपद आणि संजू सॅमसनचा राखीव यष्टिरक्षक म्हणून समावेश……आशिया चषक स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघातील हे काही हायलाईट्स आहेत. पण, या 17 सदस्यीय संघामधील एका नावाने सर्वांचे लक्ष वेधले आणि ते म्हणजे तिलक वर्मा याचे…. 7 ट्वेंटी-20 सामने खेळणाऱ्या तिलकमध्ये निवड समितीने असे काय पाहिले की त्याला वन डे संघात अन् तेही आशिया चषक सारख्या मोठ्या स्पर्धेसाठी निवडले… अय्यर पूर्णपणे तंदुरुस्त आहे, सूर्यकुमार यादवही संघात आहे, तरीही तिलकच्या निवडीने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

 

आयपीएल 2023 तिलकने मुंबई इंडियन्सकडून 14 सामन्यांत 397 धावा चोपल्या. कठीण प्रसंगी जबाबदारीने आणि आक्रमक खेळ करण्याची तिलकच्या शैलीचे रोहित शर्माने कौतुक केले होते. भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री, माजी फलंदाज संदीप पाटील यांनी भारतीय संघातील चौथ्या क्रमांकासाठी तिकलच्या निवडीसाठी बॅटींग केली होती. त्यांचा मान निवड समितीने राखला अन् तिलकला संधी मिळाली. आयपीएल दरम्यान रोहित शर्मा म्हणाला होता की, तिलक वर्माने संघ अडचणीत असताना चांगली कामगिरी करून गेला आहे. एवढ्या शांत डोक्याने खेळणं सोप्प नाही. तो सर्व फॉरमॅटमध्ये फिट बसणारा खेळाडू आहे. त्याच्याकडे तंत्र आहे आणि सतत चांगली कामगिरी करण्याची भूक आहे.

 

वेस्ट इंडिज दौऱ्यावर त्याने 39, 51,49*7*, 27 अशी दमदार फलंदाजी केली आणि तेही संघ अडचणीत असताना त्याची बॅट चांगलीच तळपली. आयर्लंड दौऱ्यावर तो काही खास करू शकला नसला तरी त्याच्याकडे मोठी खेळी करण्याची क्षमता आहे. अजित आगरकर यानेही आज हेच कौशल्य अधोरेखित केले अन् तिलकची निवड का केली हे सांगितलं.

 

तिलक वर्माचा प्रवास…(Indian Squad for Asia Cup 2023)

11व्या वर्षी टेनिस बॉलने क्रिकेट खेलणाऱ्या तिलकला प्रशिक्षक सलाम यांनी पाहिले आणि त्याचा खेळ पाहून ते प्रभावित झाले. सलाम यांनी तिलकच्या वडिलांना पोराला क्रिकेट अकॅडमीत पाठवण्याचे आवाहन केले. पण, तिलकचे वडील इलेक्ट्रिशियन होते आणि हा महागडा खेळ परवडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले. त्यावेळी सलाम यांनी तिलकचा सर्व खर्च उचलण्याची तयारी दर्शवली होती.

तिलक वर्मानेही प्रशिक्षकांचा विश्वास सार्थ ठरवला. अन् आज थेट भारताच्या वन डे संघात स्थान पटकावले.(Indian Squad for Asia Cup 2023) तिलक बालपणी रोज 40 किलोमीटर दूर क्रिकेट खेळायला जायचा. त्याला त्याच्या कष्टाचे फळ मिळाले आणि चार वर्ष त्याने विजय मर्चंट ट्रॉफीत दमदार कामगिरी करून हैदराबादच्या रणजी संघात स्थान पटकावले.

मुंबई इंडियन्सने त्याच्यातले टॅलेंट ओळखले अन् 20 लाख मुळ किंमत असलेल्या तिलकसाठी 70 लाख मोजले.9 प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तिलक वर्माने 37.35 च्या सरासरीने 523 धावा केल्या आहेत आणि त्यात 1 शतक व 2 अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने 25 सामन्यांत 56.18 च्या सरासरीने 1236 धावा केल्या आहेत. त्यात 5 शतकं व 5 अर्धशतकं आहेत.

 

join Our–  WHATSAPP GROUP  ,INSTAGRAM , TWITTER   ,  FACEBOOK PAGE– for every update

2 thoughts on “Indian Squad for Asia Cup 2023 : अय्यर, सूर्यकुमार संघात; तरीही तिलक वर्माची निवड का? इलेक्ट्रिशियनच्या मुलाचा प्रवास जाणून घ्या”

Leave a Comment