Indurikar Maharaj : कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल, पाहा नेमकं काय आहे प्रकरण!

Indurikar Maharaj :  प्रसिद्ध असणारे कीर्तनकार आणि समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या अडचणी मध्ये वाढ झाली आहे.इंदोरीकर महाराजांना  सर्वोच्च न्यायालयाने दिला फटका.(Indurikar Maharaj Marathi Latest News) सर्वोच्च न्यायालयाने महाराजांवरील गुन्हा रद्द करण्याची याचिका फेटाळून लावली आहे.त्यामुळे आता त्यांच्यावर गुन्हा दखल होणार असून पुढील खटला सत्र न्यायालयात चालणार आहे.

 

इंदोरीकर महाराजांचे काय आहे प्रकरण?

निवृत्ती महाराज यांनी काही दिवसापूर्वी त्यांनी एक वक्तत्व केले होते.कि , ‘सम तारखेला स्त्रीसंग केल्यास मुलगा आणि विषय तारखेला केल्यावर मुलगी होते’. या वक्तव्यावरून महाराजांना अहमदनगरमधील जिल्हा आणि सत्र न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. महाराजांबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ॲड. रंजना गवांदे आणि ॲड. जितेंद्र पाटील यांनी याचिका दाखल केली होती. सत्र न्यायालयाने हा खटला रद्द केला होता.यानंतर इंदोरीकरांवर महाराजांवरऔरंगाबाद खंडपीठाने  गुन्हा दाखल केल्यानंतर हा खटला पुढे संगमनेर कोर्टात चालवण्याचे आदेश दिले.

मात्र, इंदोरीकर महाराजांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती. पण आता हि याचिका आता सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता महाराजांच्या अडचणींमध्ये वाढ झाली असून पुढील खटला आता सत्र न्यायालयामध्ये मध्ये परत चालणार आहे..

 

निवृत्ती महाराजांवर नेमके आरोप काय?

निवृत्ती महाराज इंदोरीकर(Indurikar Maharaj) हे राज्यभर प्रसिद्ध असून त्यांची बोलण्याची आणि कीर्तनाची क्रेज बहुतेकजणांना आवडते.महाराजांची ग्रामीण भागामध्ये खास करून त्यांच्या कीर्तनाची क्रेज पाहायला मिळते.महाराजांच्या विडिओ क्लिप सोशल मीडिया वर पण मोठया प्रमाणात व्हायरल होतात.निवृत्ती महाराजांवर आरोप होतात कि, कीर्तनामध्ये बोलण्याचा कल महिलांना उद्देशूनच असतो आणि महिलांचा अपमान करतात.

 

महाराजांची महिलांबाबत काही वादग्रस्त शेरेबाजी

Indurikar Maharaj

 

“पोरीच्या अंगात जितके कपडे कमी, तितकी पोरगी फटकावली पाहिजे.”

“पोरीयलाबी अकली नाही राहिल्या. कुणावरबी प्रेम करायला लागल्या. आम्ही एका वर्गात होतो आणि प्रेम झालं म्हणे. कानफाड फोडलं पाहिजे.”

“नवरदेवापुढे पोरीनं नाचायला सुरुवात केली लग्नात, अरे खानदान तपासा आपले कोणते आहेत?”

 

 

join Our–  WHATSAPP GROUP  ,INSTAGRAM , TWITTER   ,  FACEBOOK PAGE– for every update 

1 thought on “Indurikar Maharaj : कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल, पाहा नेमकं काय आहे प्रकरण!”

Leave a Comment