Jyeshtha Gauri Avahan 2023 | ज्येष्ठा गौरी आवाहन 2023 मुहूर्त,ज्येष्ठागौरीचे पुजन कसे करावे?तीन दिवसाची संपूर्ण माहिती

Jyeshtha Gauri Avahan 2023 : (ज्येष्ठा गौरी आवाहन 2023) अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद महिन्यात गौरींचे पूजन करतात. गौरीच्या आगमनानंतर दोन दिवस त्यांची मनोभावे पूजा केली जाते. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या सृष्टीला ज्येष्ठा गौरींचे आवाहन केले जाते दुसऱ्या दिवशी पूजन व नैवेद्य तसेच तिसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते. अनुराधा नक्षत्रावर गौरींचे आगमन होते. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठा नक्षत्रावर त्यांचे पूजन केले जाते म्हणून त्यांना “ज्येष्ठागौरी” असे म्हणतात. गणपती बाप्पांच्या आगमनानंतर येणारा ज्येष्ठा गौरी हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर घरोघरी ज्येष्ठा गौरींचे आगमन केले जाते तर यावर्षी 21 सप्टेंबर 2023 या दिवशी ज्येष्ठा गौरीचे आव्हान आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी ज्येष्ठा गौरीच्या या सणाला “महालक्ष्मी” असेही म्हटले जाते. गौराईच्या आगमनानंतर स्त्रिया दोन दिवस त्यांची मनोभावे पूजा करतात.

महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात गौरी पूजनाची प्रथा वेगवेगळी आहे. तसेच पद्धती आणि मान्यताही वेगवेगळ्या आहेत. आज आपण या पुढील लेखात गौरीचे आगमन कसे करावे? त्यांचे आवाहन कसे करावे? (Jyeshtha Gauri Avahan 2023 Shubha Muhurta) तसेच गौरी आगमनाचा शुभ मुहूर्त काय असणार आहे ते पुढे पाहणार आहोत.

अखंड सौभाग्याच्या प्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद महिन्यात ज्येष्ठा गौरींचे पूजन करतात. पौराणिक कथेनुसार असे सांगितले जाते की, असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी एकदा गौरीला शरण गेल्या तिची प्रार्थना केली. तेव्हा गौरीने भाद्रपद महिन्यातील शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार करून पृथ्वीवरील सर्व प्राण्यांना सुखी केले. तेव्हापासूनच अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया “ज्येष्ठा गौरी” हे व्रत करतात. ज्येष्ठा गौरी महालक्ष्मीची पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केले जाते म्हणूनच त्यांना ज्येष्ठा गौरी असे म्हणतात.

तर यावर्षी ज्येष्ठा गौरी आवाहनाची (Jyeshtha Gauri Avahan 2023) तिथी 21 सप्टेंबर 2023 रोजी आहे, या दिवशी ज्येष्ठा गौरींचे आगमन होणार आहे. तर ज्येष्ठा गौरी आगमनाचे शुभ मुहूर्त 21 सप्टेंबर रोजी सकाळी 06:12 मिनिटांपासून ते 03:34 मिनिटांपर्यंत आहे. तर ज्येष्ठ गौरी पूजनाचा शुभमुहूर्त 22 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 6:27 ते दुपारी 3:34 मिनिटांपर्यंत आहे. तसेच पूजनाचा एकूण अवधी 9 तास आणि 17 मिनिटांचा आहे. आणि ज्येष्ठ गौरी विसर्जन हे 23 सप्टेंबर 2023 रोजी आणि ज्येष्ठा गौरी विसर्जनाचा शुभ मुहूर्त सूर्योदयापासून दुपारी 2 वाजून 55 मिनिटांपर्यंत आहे.

गौरी आव्हानाचा (Jyeshtha Gauri Avahan) दिवस हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो गौराईना घरामध्ये माहेरवाशिणीचे स्थान दिले जाते. ज्यामुळे आवाहन (Jyeshtha Gauri Avahan) करणे म्हणजे गौराईला आणण्यापासून तिचा पाहुणचार केला जातो. गौराईना वाजवत गाजत घरी आणण्याची प्रथा आहे गौराईना घरी आणल्यानंतर त्यांची स्थापना केली जाते. त्यांना साडी नेसवली जाते त्यांचे शृंगार केला जातो आणि घरातील माहेरवाशिणी च्या हाताने तिचे आवाहन केले जाते. कोकणात नवावधू गौरी पूजनाच्या दिवशी ववस ही देतात. गौरी पूजनामध्ये 16 हा अंक शुभ मानला जातो. त्यामुळे या दिवशी सोहळा सुवासनिंना बोलावून त्यांची पूजा केली जाते. सोळा शंकराच्या वस्तू दिल्या जातात. नैवेद्याला 16 भाज्या सोळा कोशिंबिरी, 16 चटण्या, 16 पकवान तसेच 16 पदार्थ करतात महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रांतानुसार गौरी पूजनाची प्रथा वेगवेगळी आहे.

काही कुटुंबांमध्ये गौराईचे फक्त मुखवटे असतात तर काही कुटुंबात परंपरेनुसार मानव वट्यावर जाऊन पाच सात किंवा 11 खडे आणून त्यांची पूजा करतात त्यांना खड्यांच्या गौरी असे म्हणतात. तर काही ठिकाणी पाच मडक्यांची उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखवटे लावून त्या उतरंडीला साडी चोळी नेसवतात आणि त्यांची पूजा करतात. गौरी आगमनाच्या दिवशी शुभ मुहूर्तावर गौरीच्या मुखवट्यांची आणि त्यांच्या हातांची पूजा केली जाते. त्याच रात्री गौरी उभ्या केल्या जातात. या गौरी सह त्यांची मुले म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी ही मांडली जाते घरातील पद्धती आणि परंपरेनुसार प्रवेशद्वारापासून गौरी स्थापन करण्याच्या जागेपर्यंत गौरीची पावले उमटली जातात.

आपापल्या परंपरेनुसार घराच्या उंबऱ्यात गौरीला आत आणताना जिच्या हातात गौरी असतील त्या महिलेचे पाय दुधाने किंवा पाण्याने धुतात. त्यावर कुंकाने स्वस्तिक काढले जाते आत येताना त्या महिन्याला माप ओलांडायला सांगितले जाते. आणि आतमध्ये येत येत गौरीच्या पायाचे ठसे उमटवत गोरी घरी आणली जाते. गौराईचे आगमन करताना ताट आणि चमच्याने किंवा घंटी वाजत आवाज करत गौरी घरी आणली जाते. त्यानंतर त्यांची स्थापना करण्यापूर्वी घरातील सुख-समृद्धीची जागा दाखवली जाते. इत्यादी गोष्टी दाखवण्याची प्रथा आहे. आपले सर्व घर फिरून दाखवण्याची प्रथा आहे. त्यानंतर आपल्या घरात सुख,समाधान, ऐश्वर्या लाभो अशी प्रार्थना करायची आहे. अशाप्रकारे आपल्याला गौराईचे आगमन करायचे आहे.(Jyeshtha Gauri Avahan 2023) पहिल्या दिवशी गौरीचे आगमन दुसऱ्या दिवशी गौरीचे पूजन केल्यानंतर महिला हळदीकुंकवाचा कार्यक्रम करतात आणि तिसऱ्या दिवशी शेवटचा निरोप द्यायचा असतो म्हणजेच गौरीचे विसर्जन करायचे असते.

पहिल्या दिवशी (Jyeshtha Gauri Avahan) गौरींच्या आगमनानंतर त्यांना भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रात गौरींचे पूजन केले जाते. सकाळी गौरींची पूजा आरती करून केलेल्या फराळाचा म्हणजेच रव्याचा लाडू, करंजी, चकली, शेव, कुळ पापडी, आणि वेगवेगळ्या प्रकारचे लाडू इत्यादी गोष्टींचा नैवेद्य दाखवला जातो त्यानंतर संध्याकाळी आरती करतात. पुरणपोळी ज्वारीच्या पिठाचे आंबील, अंबाडीची भाजी, 16 भाज्यांची एकत्र भाजी इत्यादी पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो आणि तिसऱ्या दिवशी गौरींचे विसर्जन केले जाते. या दिवशी दोरे घेतली जातात. महाराष्ट्रात बरेच ठिकाणी दोरे घेण्याची पद्धत आहे. नंतर गौरीचे विसर्जन केले जाते हे तीन दिवस घरात खूप मंगलमय वातावरण असते. गौरी विसर्जनाच्या दिवशी स्त्रियांनी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालावे आणि गौरीची पूजा करावी. पूजनानंतर गौराईला कानवले आणि शेवाळ्याचा भात याचा नैवेद्य दाखवा आणि तूप टाकून आरती करावी. तसेच पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेऊन त्याचे विसर्जन करावे. अशाप्रकारे वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने गौराईचा सण साजरा केला जातो.

गौरी गणपतीच्या कोण आहेत?

काही ठिकाणी गौरी म्हणजे गणपतीची आई म्हणजेच पार्वती मानली जाते. काही ठिकाणी बहीण किंवा बायकोही मानलं जातं. बऱ्याच भागात गौरी म्हणजे गणपतीची बहीण मानली जाते. म्हणून ती भावाकडे पाहुणचारासाठी येते असं म्हणतात.

jyeshtha gauri avahan 2023 wishes in marathi | ज्येष्ठा गौरी आवाहन 2023 शुभेच्छा

 

jyeshtha gauri avahan
_jyeshtha gauri avahan 2023

 

आली आली गौराई

सोन्या रुपाच्या पावलांनी

आली आली गोराई

धनधान्याच्या पावलांनी

ज्येष्ठ गौरी आवाहन निमित्त

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा”..!!

 

“पहाटे पहाटे मला जाग आली चिमण्याची

किलबिल माझ्या कानावर पडली

हळूच एक चिमणी कानात सांगून गेली

उठा उठा सकाळ झाली

ज्येष्ठ गौरी यांच्या आगमनाची वेळ झाली

ज्येष्ठ गौरी आवाहन निमित्त हार्दिक शुभेच्छा”

 

ज्येष्ठ गौरी आगमनाच्या आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा !!

 

“ज्येष्ठ गौरी आवाहन शुभ दिनी गौराई तुमच्या घरात सुख समृद्धी शांती समाधान

आणि उत्तम आरोग्य घेऊन येऊ हीच सदिच्छा…

ज्येष्ठ गौरी आवाहन निमित्त आपणास मंगलमय हार्दिक शुभेच्छा “

 happy jyeshtha gauri avahan !!

हेही वाचा 

Ganesh Chaturthi 2023 : गणेश जन्मोत्सवाच्या 10 दिवसांसाठी या 10 गोष्टी अर्पण करा, तुम्हाला बाप्पाचा आशीर्वाद मिळेल.

तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली, ती कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका..अशाच प्रकारे सखोल माहिती व अचूक माहितीसाठी आमच्या मराठी टाइम्स24 व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन व्हावे.

 

Leave a Comment