TheTrial | ‘द ट्रायल’मधील काजोलचा लिप-लॉक सीन व्हायरल; नेटकऱ्यांकडून प्रतिक्रियांचा पाऊस

The Trial : अभिनेत्री काजोलने आजवर बॉलिवूड चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. नुकतीच तिची ‘द ट्रायल’ ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या सीरिजमध्ये ती वकिलाच्या भूमिकेत असून त्यातील एक सीनने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. काजोलच्या लिपलॉकचा हा सीन आहे. इंटिमेट सीनमुळे काजोल चर्चेत आली आहे. ‘द ट्रायल’ या सीरिजच्या आधी ती नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘लस्ट स्टोरीज 2’ या अँथॉलॉजी चित्रपटात झळकली. यामध्येही तिचे काही बोल्ड सीन्स पहायला मिळाले. काजोलचा हा अंदाज पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. आपल्या नेहमीच्या प्रतिमेपेक्षा अत्यंत वेगळ्या भूमिका साकारण्यास ती प्राधान्य देत असल्याचं पहायला मिळत आहे.

‘द ट्रायल’ (TheTrial ) मधील किसिंग सीन लीक

सोशल मीडियावनर व्हायरल होणारा काजोलचा इंटिमेट सीन हा ‘द ट्रायल’ या वेब सीरिजमधील आहे. ट्विट आणि इन्स्टाग्रामवर सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये काजोल दोन वेगवेगळ्या अभिनेत्यांना किस करताना दिसतेय. यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. एका सीनमध्ये काजोल अभिनेता एली खानसोबत लिपलॉक करताना दिसतेय. तर दुसऱ्या सीनमध्ये तिच्यासोबत जीशु सेन गुप्ता आहे. या शोमध्ये काजोल आणि जीशु यांनी पती-पत्नीची भूमिका साकारली आहे.

‘द ट्रायल’(TheTrial) या सीरिजमध्ये काजोलने नोयोनिका नावाच्या वकिलाची भूमिका साकारली आहे. या सीरिजमध्ये काजोलच्या पतीला सेक्स स्कँडल आणि लाचखोरी प्रकरणात अटक होते. त्यामुळे कुटुंबासाठी ती वकिलाची नोकरी करू लागते. यामध्ये अभिनेता एली खानने विशाल चौबेची भूमिका साकारली आहे. नोयोनिका आणि विशाल हे आधी एकमेकांच्या प्रेमात होते. बऱ्याच वर्षांनंतर जेव्हा या दोघांची भेट होते, तेव्हा त्यांच्यातील जवळीक वाढू लागते. या सीरिजमध्ये नोयोनिकाच्या कथेच बरेच ट्विस्ट आहेत. अखेर कथेच्या एका वळणावर विशाल आणि नोयोनिका हे एकमेकांना किस करतात. हाच सीन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

पहा व्हिडीओ

 

‘द ट्रायल’(TheTrial) ही वेब सीरिज 14 जुलै रोजी डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली. ‘द गुड वाइफ’ या अमेरिकन शोवर आधारित या सीरिजची कथा आहे. 2009 मध्ये हा वेब शो प्रदर्शित झाला होता. या शोचे सात सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. एलिसिया फ्लोरिक नावाच्या एका महिलेची कथा यामध्ये दाखवण्यात आली आहे. तिचा पती राजकीय क्षेत्रातील असून सेक्स स्कँडलमध्ये तो फसतो.

Leave a Comment