Kisan App : या 5 अँप्समुळे शेतकऱ्याना होईल चांगला फायदा, सोबत मिळतील 6 हजार रुपये

Kisan App : शेती हा गावाकडील लोकांचा एक उत्तम व्यवसाय आहे,आज गावाकडील लोकांकडे फोन नाही हा काळ आता गेला आहे. आज गावातील प्रत्येक व्यक्तीकडे फोन आहे. मग याचा वापर का करीत नाही?.फोन चा वापर आपल्याकामासाठी करू शकतो.जी अशी अनेक कामे घरी बसून करू शकतो.त्यासाठी बाहेर जाऊन उन्हात घाम गाळण्याची गरज लागते.शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सरकारने अशी अनेक अँप्स सुरु केले आहेत. त्याच्यामाध्यमातून शेतकऱयांच्या जीवनात फायदा होतो तसेच आर्थिक मदत ही मिळते.

 

शेतकऱ्यांना यामध्ये शेतीच्या चांगल्या पद्धती सहज मिळू शकतात. शेतकऱ्याना शेती करण्यासाठी योग्य वेळ म्हणजे हवामानाची आगाऊ माहिती मिळवणे.योग्य ठिकाणाहून कमी किमतीत बियाणे घेणे,योग्यप्रकारे खरेदी करणे.तसेच तुम्हाला सरकारकडून आर्थिक मदतही मिळू शकते. हे असे 5 अँप आहेत,याचा वापर करून शेतकऱ्यांच्या शेतीतील आणि त्यांच्या आयुष्यातील अनेक समस्या सुटतील.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या विकासाच्या ध्येयाने कृषी अँप(Kisan App) लॉन्च केले आहे. या अँप चा इंटरफेस वापरकरण्यासाठी अगदी सहज आणि सोपा,सरळ आहे. या अँपद्वारे जवळपासच्या गावांमधील पिकांचे बाजारभाव ,येत्या आठवड्यातील हवामानाची माहितीही आगाऊ उपलब्ध असते.तसेच शेती साहित्य,खते, बियाणे,मशीनची समज आणि बरेच गोष्टी बद्दल तपशीलसहा माहिती देते.

IFCO Kisan

IFFCO Kisan App

IFFCO Kisan या अँपचा उद्देश हा आहे की, शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार माहिती मिळवून देणे ,ज्याच्या मदतीमुळे शेतीचे नियोजन करू शकतात. तसेच यामध्ये अँपचा वापर करून शेतीचे नियोजन करू शकतात. यामध्ये तुम्हाला शेतीविषयक सल्ले व मार्गदर्शन, बाजारभाव,हवामान,कृषीविषयक माहिती वेगवेगळ्या भाषेत व्हिडिओ, फोटो, ऑडिओच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने मिळते. काही अडचण असल्यास किसान कॉल सेंटर सेवेचा लाभ घेण्यासाठी अँपमध्ये संपर्क क्रमांकही देण्यात आला आहे. हि IFFCO KISAN अँप 2015 मध्ये लाँच केले आहे.

 

Pradhan Mantri Fasal Bima Yojana

Pradhan Mantri Fasal Bima Yojana

पीक विमा हे एक अँप शेतकऱ्यांच्या अतिशय महत्वाचे अँप आहे. या अँपचे उद्दिष्ट आहे कि,शेतकऱ्यांच्या पिकांसाठी विम्याची गणना करणे. आणि त्यांच्या पिकांसाठी आणि क्षेत्रासाठी कट-ऑफ तारखा आणि व्यवसाय संपर्क तपशील देखील प्रदान करते. या अँपवर सर्व डेटा मिळू शकतो जसे की विमा, अनुदान इत्यादी तपशील समाविष्ट आहेत. यात एक वेबपृष्ठ देखील आहे जे शेतकरी, राज्ये, विमा कंपन्या आणि बँका यांसारख्या सर्व भागधारकांना समर्थन देते.

Tractor Junction App

Tractor Junction App

ट्रॅक्टर जंक्शन मोबाईल अँप हे भारतीय शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी तयार करण्यात आले आहे, या अँपचा(Kisan App) वापर  शेतकरी त्याच्या आवडत्या भाषेत सर्व शेती आणि शेतीविषयक व्यवसायाशी संबंधित माहिती मिळवू शकतो.पिकाच्या सोयीसाठी सर्व टॉप ब्रँड्सचे ट्रॅक्टर, थ्रेशर्स, टूल्स, टायर आणि इतर कृषी यंत्रांची स्वतंत्र माहिती देण्यात आली आहे.यामध्ये शेतकरी सेकंड हँड ट्रॅक्टर, हार्वेस्टर, माल, जमीन आणि मालमत्ता खरेदी आणि विक्री करू शकतात.

 

Pradhan Mantri KIsan Gol mobile App

Pradhan Mantri KIsan Gol mobile App

शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी सरकारने नवीन केंद्रीय क्षेत्र योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) सुरू केली, ही योजना फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू करण्यात आली. यामध्ये दर महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षभरात 6 हजार रुपये जमा होतात. 2 हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये 3 वेळा घातले जातात. म्हणजेच दरवर्षी शेतकऱ्याला सहा हजार रुपयांची मदत दिली जाते.

Pm Kisan Samman Nidhi

Pm Kisan Samman Nidhi
या अँपचा(Kisan App) वापर करून शेतकरी सहजपणे शेती व्यवसाय करू शकतात आणि सरकारने सुरू केलेल्या या अँप्समुळे विमा, अद्ययावत माहिती आणि आर्थिक मदतही मिळत आहे.

 

 

join Our–  WHATSAPP GROUP  ,INSTAGRAM , TWITTER   ,  FACEBOOK PAGE– for every update 

Leave a Comment